![]()
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात केवळ मोबाइल चॅट्स आणि फोनवरील संभाषणापुरतीच लग्नाची चर्चा मर्यादित होती. प्रत्यक्षात त्यांचे कोणतेही गुपचूप लग्न झाले नसल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. या नवीन माहितीमुळे या प्रकरणातील ‘गुपचूप लग्नाच्या’ थिअरीला आता पूर्णविराम मिळाला आहे. दोघेही न्यायालयीन कोठडीत १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून २६ वर्षीय केतन अग्रवालला खोल दरीत ढकलून ठार मारण्यात आले होते. केतन हा आपल्या प्रेमसंबंधातील मोठा अडथळा ठरत असल्याने २० वर्षीय नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा २२ वर्षीय प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून त्याच्या हत्येचा क्रूर कट रचला. साखरपुडा झालेला असतानाही सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात केवळ मोबाइल चॅट्स आणि फोनवरील संभाषणापुरतीच लग्नाची चर्चा मर्यादित होती. प्रत्यक्षात त्यांचे कोणतेही गुपचूप लग्न झाले नसल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. या नवीन माहितीमुळे या प्रकरणातील ‘गुपचूप लग्नाच्या’ थिअरीला आता पूर्णविराम मिळाला आहे. यापूर्वी, पोलिसांनी जप्त केलेल्या आरोपींच्या मोबाइलमधील व्हॉट्सॲप चॅटच्या विश्लेषणानंतर सिया आणि चेतन यांनी कुटुंबीयांपासून लपवून गुपचूप लग्न केल्याची शंका व्यक्त केली जात होती. दोघांनी एका लॉजमध्ये प्रतीकात्मक विवाह केल्याची चर्चा होती. या अनुषंगाने पोलिसांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि साक्षीदारांचा शोध सुरू केला होता. तपासासाठी पोलिस राजस्थानात या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक विशेष पथक थेट राजस्थानमध्ये दाखल झाले आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या राजस्थान प्रवासाची पार्श्वभूमी तपासणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. सिया आणि चेतन डिसेंबर २०२५ मध्ये एका मित्रासोबत राजस्थानला फिरण्यास गेले होते. पोलिस त्यांच्या खाटू श्याम मंदिर, जोधपूर आणि उदयपूर येथील भेटींची कसून चौकशी करत आहेत.
Source link
केतन अग्रवाल हत्याकांड:सिया आणि चेतनची केवळ मोबाइलवरच विवाहाची चर्चा, लॉजमध्ये प्रतीकात्मक लग्न केले नाही