![]()
बाबा फर्जनच्या बंगल्यातून गुन्हे शाखेने जप्त केलेली ५.२६ कोटींची रोकड बुधवारी (१५ जुलै) न्यायालयाच्या आदेशाने एसबीआय बँकेत जमा केली. छावणी पोलिसांनी ४ कोठ्या भरून ही रक्कम बँकेत नेली. सुरुवातीला ५ मशीनद्वारे १६ तास मोजलेली ही रक्कम आता बँक कर्मचारी मोजत असून, बुधवारी केवळ एकच कोठी मोजून पूर्ण झाली होती. एवढी मोठी रोकड आणि शस्त्रे असल्याने छावणी पोलिस ठाण्याच्या मुख्य गेटला चक्क हातकडीचे कुलूप लावून कडक पहारा ठेवण्यात आला होता. वरिष्ठांना कोषागार विभागातील सुरक्षितता न रुचल्याने कायदेशीर परवानगी घेऊन ती छावणी पोलिसांच्या अधिकृत बँक खात्यात वळवण्यात आली. रोकड हलवली असली तरी शस्त्रे अद्याप ठाण्यातच आहेत. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण सुरू आता बंगल्यातील ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जप्त डीव्हीआरचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले जाणार असून, यातून अनेक नवीन नावे व हालचाली समोर येण्याची शक्यता आहे. जप्त रक्कम बँकेत फिक्स डिपॉझिट करणे शक्य रोकड जप्त केल्यावर २४ तासांत दंडाधिकाऱ्यांना अहवाल द्यावा लागतो. रोकड कुठे ठेवायची याचे अंतिम अधिकार न्यायालयाकडे असतात. बीएनएस कलम ४९७ (पूर्वीचे सीआरपीसी ४५१/४५७) अंतर्गत पोलिस कोर्टात अर्ज करतात. सर्वोच्च न्यायालयाने २००२ मधील सुंदरभाई अंबालाल देसाई विरुद्ध या ऐतिहासिक खटल्यात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जप्त रोकड ठाण्यात पडून खराब होऊ नये म्हणून न्यायालयाच्या मंजुरीने बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवता येते. यावरील व्याजासह मूळ रक्कम निकालानंतर योग्य व्यक्तीला किंवा सरकारला सुपूर्द केली जाते.
Source link
बाबा फर्जनच्या बंगल्यातील रोकड बँकेत जमा:पोलिसांनी जमा केल्या 4 कोठ्या; आतापर्यंत एकच मोजून पूर्ण झाल्याची माहिती