Headlines

गुरुकुंज मोझरीचे एसटी बसस्थानक बनले समस्यांचे माहेरघर:पावसाळ्यातही प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळेना; सार्वजनिक स्वच्छतागृहालाही टाळे



‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गुरुकुंज मोझरी बसस्थानकाची अवस्था सध्या दयनीय झाली असून हे बसस्थानक अनेक समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची योग्य देखभाल होत न

.

अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गुरुकुंज मोझरी बसस्थानकातून शिरजगाव, शिवणगाव, अनकवाडी, तळेगाव, वऱ्हा, कुऱ्हा आदी गावांतील प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज प्रवास करतात. याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या एसटी बसही या स्थानकावर थांबतात. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव असून परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृहाच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असून सार्वजनिक स्वच्छतागृहाला गेल्या आठवडाभरापासून कुलूप लावण्यात आले आहे. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अनेकांना बसस्थानकाबाहेर आडोसा शोधून नैसर्गिक विधी उरकावी लागत आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरापासून बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याची सुविधाही बंद असल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या बसस्थानकाची नियमित स्वच्छता, देखभाल होत नाही. वाहतूक नियंत्रण कक्षासह संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

३०९.६ लाख खर्चाचे हेच का ते फळ? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मोझरी विकास आराखड्यांतर्गत सुमारे ३०९.६ लाख रुपयांचा निधी खर्च करुन हे आधुनिक बसस्थानक उभारण्यात आले आहे. परंतु प्रवासी व भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या या बसस्थानकातील अनेक सुविधा मात्र सध्या निष्क्रिय अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

लवकरच सुधारणा करण्यात येणार ^जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने पाण्याविना प्रवाशांची गैरसोय होत आहे.यासंदर्भात वरिष्ठांना कळवले असून, सुधारणा करण्यात येईल. अशफाक अहमद पटेल , वाहतूक नियंत्रक, बसस्थानक मोझरी .



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *