![]()
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. अयोध्या राम मंदिर कथित गैरव्यवहार प्रकरणावरून त्यांनी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांनी थेट सवाल केला की, “गोविंददेव गिरी महाराज हे खजिनदार असल्याने तिजोरीचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी त्यांचीच आहे. ते कायद्याच्या वर नाहीत, मग एवढी मोठी चोरी होईपर्यंत ते झोपले होते का?” या कथित गैरव्यवहारावर त्यांनी महाराजांकडून स्पष्टीकरण मागितले. यावेळी राऊत यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शनावरून मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. तसेच, सुधीर मुनगंटीवार यांना थांबवल्याचा उल्लेख करत शिंदे सेनेचे हिंदुत्व वेगळे आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला. परिसिमन विधेयकाबाबतचा निर्णय सर्वसहमतीने होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अयोध्येतील राम मंदिर कथित लुटीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘रामरक्षा’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच ‘रामरक्षा’ उपक्रमासाठी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण पत्र पाठवले आहे. पत्रात नमूद केले आहे की, “आपण प्रखर रामभक्त असून कारसेवेत सहभागी झाला होता. आपल्यासारख्यांच्या संघर्षातून मंदिर उभे राहिले, मात्र तिथे आता शेकडो कोटींचा अपहार झाला आहे. या राम मंदिर लुटीविरोधात लोकांत जागृती आणण्यासाठी शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता रामनगर, नागपूर येथील राम मंदिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘रामरक्षा’ (रामाची सुरक्षा) उपक्रम होत आहे. आपण नागपूरचे असल्याने या उपक्रमात आवर्जून सहभागी व्हावे.” संबंधित बातमी वाचा. . रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र:रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे दिले निमंत्रण अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत ‘रामरक्षा’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत येत्या १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे थेट निमंत्रण ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे दिले आहे. या पत्रातून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वाची आठवण करून देत जोरदार राजकीय टोलाही लगावला आहे. सविस्तर वाचा
Source link
संजय राऊत यांचा गोविंददेव गिरी महाराजांना सवाल:अयोध्या राम मंदिर कथित गैरव्यवहारावर उपस्थित केले प्रश्न