![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली दौऱ्यावर गेले. गेल्या ४८ तासांतील हा त्यांचा दुसरा दौरा आहे. याआधी १४ जुलै रोजी ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना भेटले होते. उद्धवसेनेच्या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिल्लीत शिंदेंची ताकद वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळू शकते. राज्यातही त्यांच्या मागणीनुसार एक कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. शिंदे दिल्लीमध्ये गुरुवार व शुक्रवार दोन दिवस मुक्काम करण्याची शक्यता आहे. ते एनडीएच्या बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत. पेच सोडवण्यासाठी दौरा सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर आणि बंडूू जाधव यांच्यात स्पर्धा आहे. त्यापैकी कोणत्या दोघांना संधी द्यावी, असा पेच एकनाथ शिंदेंपुढे असल्याने त्यावर तोडग्यासाठी ते पुन्हा दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत.
Source link
शिंदे 48 तासांत दुसऱ्यांदा दिल्लीत शाहांच्या भेटीला:केंद्र, राज्यात मंत्रिपदे मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी