Headlines

क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षाला हद्दपारीची नोटीस:तीन वर्षात 14 गुन्हे दाखल, शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया




हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल झालेल्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना पोलिस फ्रशासनाकडून हद्दपारीची नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाई बद्दल शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यात शेतीमालास भाव देणे, शेतकऱ्यांची होणारी लुट थांबविणे, पिकविमा मंजूर करणे यासह शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आंदोलने केली जात आहे. यामध्ये रास्ता रोको, प्रतिकात्मक नोटा उधळणे, लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांच्या छायाचित्राला जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह १४ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये गोरेगाव पोलिस ठाण्यात ११, नर्सी नामदेव, सेनगाव, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतरही संघटनेकडे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिस प्रशासनाने क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आंदोलन केले तर त्याच चुक काय आहे असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. या कारवाईच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरु केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न: गजानन कावरखे, मराठवाडा अध्यक्ष क्रांतीकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आंदोलन केले जात असल्याने शासन व प्रशासनाकडून दडपशाही केली जात आहे. मात्र आपल्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आंदोलन सुरुच राहतील. तुरुंगात स्थानबध्द केले तर तुरुंगातही आंदोलन सुरु केले जातील. शेतकरी आपल्या पाठीशी असल्याने अशा कारवाईला आपण घाबरणारा नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *