‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना आज पोलिसांनी अचानक हटवून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. या कारवाईन
.
‘ही तर निव्वळ हुकूमशाही आणि दडपशाही’
संजय राऊत म्हणाले, “सोनम वांगचुक हे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी गेल्या २१ दिवसांपासून स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला बसले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची त्यांची प्रमुख मागणी होती, पण सरकारने तो राजीनामा घेतला नाही. त्यांच्या प्रश्नांचा निकाल लावण्याऐवजी पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात नेले. वांगचुक यांच्या प्राणाची सरकारला खरोखरच काळजी असती, तर उपोषण सुरू झाल्यावर लगेचच चर्चेतून मार्ग काढला असता. मात्र, सरकारने जाणीवपूर्वक बघ्याची भूमिका घेत थेट दडपशाहीचा अवलंब केला आहे. हा देश किती हुकूमशाहीच्या मार्गाने चालला आहे, हेच यातून दिसते.”
रामरक्षा आंदोलनावरून लक्ष वळवण्याचा डाव
याच कारवाईमागे दुसरा एक मोठा राजकीय डाव असल्याचा अत्यंत गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आज नागपूरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर लुटीविरोधात ‘रामरक्षा आंदोलन’ आणि मोठा एल्गार पुकारण्यात आला आहे. या बहुचर्चित आंदोलनावरून देशाचे आणि मीडियाचे लक्ष हटवण्यासाठीच जाणीवपूर्वक सोनम वांगचुक यांना आजच्याच दिवशी दडपशाहीच्या मार्गाने अटक करून रुग्णालयात हलवण्यात आले, असा दावा राऊत यांनी केला आहे. सरकारच्या या खेळीमुळे शिवसेनेचे आंदोलन दडपले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
उद्धव ठाकरेंचा नागपूर दौरा ठरल्याप्रमाणेच
सरकारच्या या दबावाला न जुमानता उद्धव ठाकरे यांचा नियोजित नागपूर दौरा आणि रामरक्षा आंदोलन ठरलेल्या वेळेनुसारच पार पडेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता नागपूरला पोहोचतील आणि सायंकाळी ४ वाजता रामनगर येथील राममंदिरातून या आंदोलनाला सुरुवात होईल.
संबंधित बातमी वाचा..
पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेले, उपोषणाचा 21 वा दिवस:CJP संस्थापक दीपके म्हणाले -सोनम सरांना शिवीगाळ झाली, ओढत नेले; आंदोलक संतापले

दिल्लीतील जंतर-मंतर येथे २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी सफदरजंग रुग्णालयात नेले. आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केल्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी सोनम यांना अपशब्द वापरले आणि बळजबरीने ओढत रुग्णालयात नेले. त्यांनी असाही दावा केला की, पोलिसांनी त्यांच्याशीही गैरवर्तन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली. सविस्तर वाचा
सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, आदित्य ठाकरेंसह नेत्यांच्या प्रतिक्रिया

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सविस्तर वाचा