Headlines

नफेखोरीसाठी रेस्टॉरंटच्या डिशमध्ये कृत्रिम ॲनालॉग पनीर:दुधात लिंबाचा रस टाकून बनते खरे पनीर; ॲनालॉगसाठी मात्र पामतेल




पनीर म्हटले की शाकाहारी जेवणातील शाही थाट! पण बाजारात सध्या दुधापासून बनलेल्या पनीरच्या नावाखाली कृत्रिम ॲनालॉग पनीरचा सर्रास वापर होत आहे. पामतेल, सोया प्रोटीन, व्हेजिटेबल प्रोटीन आणि स्टार्चच्या मिश्रणातून तयार होणारे हे पनीर दुग्धजन्य पनीरसारखेच दिसते. मात्र, खऱ्या पनीरसारखा पोत, चव देण्यासाठी फ्लेवरिंग एजंट्स आणि रंगही मिसळले जातात. ॲनालॉग पनीरवर बंदी नाही. तरी यापुढे रेस्टॉरंट, केटरर्स, फास्टफूड विक्रेत्यांना ॲनालॉग पनीर दिले जात असल्याचा ठळक उल्लेख करणे बंधनकारक केल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली आहे. दुधाचे पनीर ॲनालॉग पनीर अर्थकारण : तीनपट कमी किमतीत मिळते ॲनालॉग पनीर ठळक उल्लेख केला नाही तर गुन्हे दाखल करू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *