Headlines

बजाजनगरात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू:पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हे दाखल, नातेवाइकांकडून हत्येचा संशय




बजाजनगरात सोमवारी (20 जुलै) पहाटे 30 वर्षीय कोमल योगेश मोरे या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगणक अभियंता असलेल्या पतीनेच सासरच्या मंडळींच्या साथीने कोमलचा घात केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी एम. वाळूज पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कोमल यांचा विवाह 2016 मध्ये संगणक अभियंता योगेश मोरे (वय 38) याच्याशी झाला होता. त्यांना रुद्राक्ष (8 वर्षे) आणि ध्रुव (अडीच वर्षे) अशी दोन चिमुकली मुले आहेत. सोमवारी पहाटे 4:30 ते 5:30 वाजेच्या सुमारास सासरे रेवनाथ मोरे व दीर सचिन मोरे यांनी कोमल यांचे वडील राजधर पवार यांना फोन करून ‘कोमल बेशुद्ध पडली आहे,’ अशी माहिती दिली. सासरच्या मंडळींकडून कोमल यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे; मात्र माहेरच्यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दारूच्या नशेत सतत मारहाण माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नानंतर काही दिवसांपासूनच पती योगेश हा दारूच्या नशेत कोमल यांना अमानुष मारहाण करत असे. याशिवाय दीर सचिन मोरे, सासरे रेवनाथ मोरे आणि सासू कांता मोरे हेदेखील विविध कारणांवरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. या त्रासाबाबत कोमल यांनी अनेकदा माहेरी सांगितले होते. माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही हा छळ सतत सुरूच राहिला. सासरच्या जाचाला कंटाळूनच कोमल यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत एम. वाळूज पोलिसांनी पती योगेश मोरे, दीर सचिन मोरे, सासरे रेवनाथ मोरे आणि सासू कांता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *