![]()
उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार सोहळ्यात अकोला येथील डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) अमरावती विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. हा सोहळा मध्यवर्ती सभागृह, एलफिन्स्टन तांत्रिक विद्यालय मुंबई येथे पार पडला. प्रास्ताविक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी करत राज्यातील आयटीआयची प्रगती व कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. सोहळ्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते संस्थेला सन्मानचिन्ह व एक रुपये रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, डॉ. अपूर्वा पालकर (कुलगुरू, रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठ पुणे), अमित सैनी (आयुक्त), अनंत सोमकुवर (सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती) उपस्थित होते. राज्यभरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, अधिकारी व कर्मचारी सोहळ्यास उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे, कर्मचारी उपस्थित होते. मंगलप्रभात लोढा यांनी नमूद केले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्था कौशल्य विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अकोला आयटीआयने गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, उद्योगाभिमुख उपक्रम, प्रशिक्षणार्थीचा विकास व प्रभावी व्यवस्थापनाच्या जोरावर विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देत त्यांना रोजगारक्षम बनवण्याचे कार्य संस्था करत आहे. ही कामगिरी केवळ संस्थेपुरती मर्यादित नसून अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून राज्यातील कौशल्य विकास क्षेत्रात संस्थेने ठसा उमटवला आहे. प्रशिक्षणातील गुणवत्ता, उपक्रमात बाजी
Source link
आयटीआय प्रशिक्षण संस्थेत विभागात प्रथम:मुंबई येथे आयोजित समारंभात उद्योजकता मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले पारितोषिक