Headlines

Vanchit Bahujan Aghadi Calls for Maharashtra Bandh; Prakash Ambedkar Appeal


दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासा

.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत, राज्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांना या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे थेट आवाहन केले आहे.

नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी छर्रे वापरलेत. असे छर्रे वापरता येणार नाही, अशी बंदी युनायटेड नेशनने घातल्यानंतर सुद्धा दिल्ली पोलिस छर्रे वापरते. वॉटर कॅनने पोरांना मारले जात आहे, अमाणुष लाठीचार्ज केला जातोय, या लाठीचार्जवरून दिसतंय की, जालियानवाला बागचा जनरल डायर हा पुन्हा जन्माला आलाय आणि त्याची ही कृती आहे का? असे दिसतंय, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

“ज्या प्रकारे परीक्षेमधील घोटाळे होत आहेत आणि एकंदरीत जे दिसतंय विद्यार्थ्यांची विचार करण्याची कृती आणि निर्णयाची कृती ही शिक्षणाच्या, परीक्षेच्या माध्यमातून होते. तिलाच खुंटीत घालण्याचे कामकाज चालले आहे. अशिक्षित ठेवणे हा सरकारच भाग राहिलाय. लोक अशिक्षित राहिती, तर आपली सत्ता कायम राहील, असा आभास निर्माण केला जातोय. त्याविरोधात हा २३ जुलैचा बंद आम्ही जाहीर केलेला आहे,” अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

“नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की, हुकूमशाही यायला लागली आहे. सगळे राजकीप पक्ष मोडकळीस काढायला निघालेले आहेत. अशावेळेस सामान्य नागरिकांनी रस्त्यावर येऊन आपले असणारे मत आणि भूमिका मांडली पाहिजे. २३ जुलैच्या बंदमध्ये सामान्य माणूस सहभागी होईल,” असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला.

हे ही वाचा…

इंडिया आघाडी आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करतेय:दिल्लीतील आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोतांचे वादग्रस्त वक्तव्य

दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाष्य केले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तुलना थेट ‘आतंकवाद्यांशी’ करत, “या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून एक नवा मोठा वाद पेटला आहे. सविस्तर वाचा…

भाजपच्या ‘जनरल कायर’ने तरुणांवर लाठीचार्ज केला:दिल्लीत जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती, राऊतांचा सरकारवर निशाणा

दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे तिथे जमलेले लोकं कोणत्या व्यक्तीच्या मागे तिथे आलेले नाहीत. राहुल गांधी आणि आम्ही सर्वांनी नीट पेपरफुटीचा मु्द्दा उचलून धरला त्यातून ही लढाई सुरू झाली, त्या लढाईत तेल ओतण्याचे काम देशाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी केले, त्यामुळे हा भडका उडाला आहे. पेपरफुटीचे केंद्र हे महाराष्ट्र आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला पाहिजे, यात आरएसएस लोकं आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…

‘परीक्षा पे चर्चा’ प्रमाणे आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करा:इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा, हे सरकारच मानसिक रुग्ण झालंय – राज ठाकरे

दिल्लीत पेपरफुटी आणि ‘नीट’ (NEET) परीक्षेतील अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत कठोर अन् बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. लाठीचार्जचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत, “१८ जुलै रोजी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने फरफटत रुग्णालयात दाखल करण्यापासून ते काल विद्यार्थ्यांवर बेफाम लाठीचार्ज करण्यापर्यंतच्या घटना पाहता हे सरकारच ‘मानसिक रुग्ण’ झाले आहे आणि त्यांनाच आता रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे,” अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.