Headlines

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करणे अनिवार्य:डॉ. विशाल तिडके यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र‎




आजच्या प्रचंड स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी उद्योग विश्वाच्या आधुनिक गरजेनुसार स्वतःमध्ये विविध कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे. तसेच महाविद्यालयात उपलब्ध होणाऱ्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंटच्या संधींचा विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे लाभ घ्यावा, असे आवाहन संजीवनी विद्यापीठ कोपरगाव येथील अधिष्ठाता डॉ. विशाल तिडके यांनी केले. न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील बीबीए व बीबीए आयबी विभागाच्यावतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांना करिअरविषयी योग्य दिशा मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि रोजगारक्षम कौशल्ये प्राप्त व्हावीत, हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश होता. डॉ. तिडके यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनात करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत कौशल्ये आणि संवाद कौशल्ये यावर विशेष प्रकाश टाकला. जीवनात शाश्वत यश मिळवण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान असून चालत नाही तर त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, कामातील सातत्य, प्रचंड आत्मविश्वास आणि योग्य पूर्वतयारीची आवश्यकता असते, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उच्च शिक्षणासोबतच कौशल्य विकास, शिस्त आणि वेळेचे चोख नियोजन या त्रिसूत्रीच्या जोरावरच कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण काळात स्वतःला सक्षम बनवून प्लेसमेंटच्या प्रत्येक संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागप्रमुख प्रा. डॉ. मंगेश वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ वर्गातील शिक्षण पुरेसे नसून औद्योगिक संवाद आणि अशा प्रेरणादायी व्याख्यानांचे महत्त्व किती मोठे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजित सातभाई यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय डॉ. रूपाली मिस्किन यांनी करून दिला तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. राहुल थोरात यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी प्रा. डॉ. अनिता पेटकर, प्रा. शामल जाधव, प्रा. नम्रता ठाकर, डॉ. अस्मिता जैन, प्रा. वैभव लोंढे व प्रा. ओंकार आव्हाड यांच्यासह बीबीए व बीबीए आयबी विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशासाठी फक्त तांत्रिक ज्ञान उपयुक्त नाही जीवनात शाश्वत यश मिळवण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान असून चालत नाही तर त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, कामातील सातत्य, प्रचंड आत्मविश्वास आणि योग्य पूर्वतयारीची आवश्यकता असते, असे तिडके यांनी विद्यार्थ्यांना उदाहरणांसह स्पष्ट करुन सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *