Headlines

शाश्वत शेती विकासासाठी व्यावसायिक देशी गोवंशांचे जतन:संवर्धन आवश्यक, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन



शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी ही संकल्पना खऱ्या अर्थाने कृतीत आणण्यासाठी व्यावसायिक शेतीला दुग्ध व्यवसायासारख्या सक्षम पूरक व्यवसायाची गरज आहे. राज्याचा, विशेषतः विदर्भ व मराठवाड्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी व्यावसायिक देशी गोवंशाचे जतन व संवर्धन आव

.

महाराष्ट्र शासनाने दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाद्वारे आयोजित सामूहिक गोपूजन, गोवंश लसीकरण व विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारने गाईला ‘राज्यमाता’ दर्जा देऊन तिचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

गोवंश हा केवळ दूध उत्पादनापुरता मर्यादित नसून शेणखत, गोमूत्र, बायोगॅस आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनाचा मुख्य आधार आहे, असे कुलगुरू म्हणाले. शेतातील पिकांचे अवशेष, कडबा, कुटार यांसारख्या अल्प खर्चाच्या चाऱ्याचा वापर करून अत्यंत परिपूर्ण असे अमृततुल्य दूध निर्माण करण्याची क्षमता आपल्या पशुधनात आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून दररोज किमान १० लिटर दुग्ध उत्पादन देणाऱ्या गोवंशाचे संगोपन केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.पशूपालन हा देशातील सर्वात कमी खर्चाचा व्यवसाय मानला जातो. शेतातील तन, गवत आणि मळणीनंतर वाया जाणारे अवशेष (कडबा-कुटार, तणीस) जनावरांच्या आहारात वापरून सकस दूध उत्पादन मिळते. सोबतच मौल्यवान शेणखत, मलमूत्र आणि दरवर्षी नवीन पिढीची निर्मिती होते. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते.

राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश्वर शेळके यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *