![]()
तब्बल दहा दिवसांनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकरी सुखावले असून, पावसाच्या वार्षिक सरासरीतही चार टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे या पावसाने एक बळी घेतला असून, दोन तालुक्यातील चार घरेही जमीनदोस्त झाली. दरम्यान दर्यापूर तालुक्यातील गोळेगाव येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३, अमरावतीच्या ग्रामीण भागातील एक घर जमीनदोस्त झाले. पावसाचा बळी ठरलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव प्रवीण सुभाषराव चव्हाण (वय ३७ वर्षे) असे आहे. प्रवीण यांच्या पत्नी त्या गावच्या सरपंच आहेत. सततच्या पावसामुळे नांदगाव तालुक्याच्या दोन गावांतील ३ घरे जमीनदोस्त झाली असून, अमरावती तालुक्याच्या ग्रामीण भागातही एका गावातील एक घर पडले. या चारही दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही. प्रशासन व नागरिकांनी धावपळ करुन त्यातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान बुधवारी सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासांत जिल्ह्यात १५.७ मिलिमीटर उर्वरित. पान ४ संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. त्यामुळे कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना छत्री, रेनकोटचा आधार घ्यावा लागला. २४ तासांत ‘यलो अलर्ट’ येत्या २४ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ मिळाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सज्जतेचे निर्देश दिले असून, पूरप्रवण गावांची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना तालुका प्रशासनाला दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या कार्यालयामार्फत या सूचना देण्यात आल्या. ४८ तासांत थेट २७.४ मिलिमीटरची झाली वाढ मंगळवारी जिल्ह्यात ११.७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ बुधवारी दिवसभरात पुन्हा १५.७ मि.मी. पाऊस पडल्याने अवघ्या दोन दिवसात जिल्ह्याचे पर्जन्यमान थेट २७.४ मिलिमीटरने वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापार-उदीमालाही वेग आला आहे. धरणांची टक्केवारी अशी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या उर्ध्व वर्धा (मोर्शी) प्रकल्पाची उपयुक्त साठवण क्षमता ५६४.०५ द.ल.घ.मी. असून सध्या २८८.०५ द.ल.घ.मी. (५१.०७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मध्यम प्रकल्पाच्या श्रेणीतील चंद्रभागाची टक्केवारी ८०.२५ (३३.१० द.ल.घ.मी.), शहानूरची टक्केवारी ३३.२८ (१५.३२ द.ल.घ.मी.),पूर्णाची टक्केवारी ७२.७७ (२५.७४ द.ल.घ.मी.), सपनची ४१.१७ (१५.८९ द.ल.घ.मी.) एवढी झाली आहे.
Source link
जिल्ह्यात 24 तासांत 15.7 मिमीची नोंद; एका जणाचा बळी:4 घरे पडली, दोन दिवसांपासून संततधार पाऊस, जलसाठे वाढले, शेतकरी सुखावले