Headlines

गृहकारभार पांडू हवालदार चालवतायत!:हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर हल्लाबोल, 26 जुलैच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा




विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी 26 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांचा आक्रोश, लोकशाहीचे संरक्षण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांनी नागरिकांचे संरक्षण करण्याऐवजी आंदोलकांवर दडपशाही सुरू केली असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांचे वर्तन लोकशाहीविरोधी सपकाळ म्हणाले की, अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले जात आहे, त्यांना कोठडीत ठेवले जात आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना माहितीही दिली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. लोकशाहीने दिलेला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असून काँग्रेस हे कदापि सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ड्रग्ज प्रकरणातील व्हिडिओची चौकशी आणि कारवाईची हमी मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावरही सपकाळ यांनी भाष्य केले. या व्हिडिओमुळे गंभीर शंका निर्माण झाल्याचे सांगत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात पोलिस महासंचालकांची भेट घेतल्याचे सांगत सपकाळ म्हणाले की, संबंधित कर्मचाऱ्यावरील चौकशी सुरू असून त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. तसेच राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक बोलावून आवश्यक सूचना दिल्या जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात पोलीस स्टेट निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सरकारचे हस्तक म्हणून नव्हे, तर स्वतंत्रपणे काम केले पाहिजे, असे सांगत सपकाळ यांनी राज्यात ‘पोलीस स्टेट’ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. “लोकशाही गुंडाळून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. गृह विभागाचा कारभार पांडू हवालदार चालवत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. 26 जुलैच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा 26 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाचे स्वागत करत काँग्रेस त्याला पाठिंबा देणार असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर पुढील भूमिका जाहीर केली जाईल. इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून संयुक्त भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने आधीपासूनच राज्यभर आंदोलनात्मक भूमिका घेतली असून भविष्यातही विविध आंदोलनांमध्ये सहभाग कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. मोदी, अण्णा हजारे आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उशिराने प्रतिक्रिया दिल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले की, “30 दिवसांनंतर मोदी बोलले. अण्णा हजारेही आता जागे झाले आहेत. त्यांनी पुन्हा झोपू नये, अशी आमची अपेक्षा आहे.” सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. “ते आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मला केवळ ‘गेट वेल सून’ म्हणावंसं वाटतं,” असा टोला त्यांनी लगावला. कर्जमाफीवर सरकारला लक्ष्य राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवरही सपकाळ यांनी टीका केली. “36 हजार 566 शेतकऱ्यांपुरती मर्यादित असलेली ही कर्जमाफी म्हणजे ‘खोदा पहाड, निकला खटमल’ अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांना वाढदिवसाची ही भेट म्हणावी का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हेही वाचा… राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चेला यावं:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आव्हान, म्हणाले- विद्यार्थी आंदोलनातून ठाकरे बंधूंचा अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न नीट पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी संसदेत येऊन चर्चा करावी, असे खुले आव्हान देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करू नये, असेही म्हटले. फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांच्यात खरोखर हिंमत असेल, लोकशाही आणि संविधानावर विश्वास असेल तर त्यांनी संसदेत चर्चा करावी. चर्चेची सर्वात महत्त्वाची जागा संसद आहे. मग चर्चेपासून पळ का काढता? कारण तुमची पोलखोल होईल, याची तुम्हाला भीती वाटते.” येथे वाचा संपूर्ण बातमी नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार:26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली. राज ठाकरे म्हणाले की, देशभरात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते. मात्र, त्याला दडपण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असून त्यांच्यावर लाठीमार करण्यात येत आहे. या कारवाईचे पडसाद आता संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रातही उमटत असल्याचे त्यांनी सांगितले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *