Headlines

Sunetra Pawar Unveils Ajit Pawar Statue & Inaugurates Exhibition


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाट

.

नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबीय, जय पवार आणि अनेक समर्थक उपस्थित होते. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवारांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी छायाचित्र प्रदर्शनाला भेट देत अजित पवार यांच्या बालपणापासून ते राजकीय कारकिर्दीपर्यंतच्या विविध टप्प्यांचे दर्शन घडवणारी छायाचित्रे पाहिली.

या प्रदर्शनात त्यांच्या जनसेवेची तळमळ, विकासकामांमधील योगदान आणि सार्वजनिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचे दर्शन घडवण्यात आले आहे.

‘आठवणींच्या पलीकडे… दादांचा जिवंत वारसा’

कार्यक्रमानंतर सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. “आठवणींच्या पलीकडे… दादांचा जिवंत वारसा! स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे लोकार्पण आज संपन्न झाले,” असे त्यांनी म्हटले.

पुढे त्या म्हणाल्या, “दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, कार्यपद्धती, जनहिताची बांधिलकी आणि विकासाची दूरदृष्टी आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. बारामतीसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेला वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.” त्यांनी असेही नमूद केले की, हा पुतळा आणि छायाचित्र दालन केवळ आठवणी जपणारे नसून अजित पवार यांच्या विचारांचा, कार्याचा आणि विकासदृष्टीचा जिवंत वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारे प्रेरणास्थान ठरेल.

विमान अपघातात झाले होते निधन

अहवालांनुसार, 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना Learjet 45 (VT-SSK) या खासगी विमानाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक विमान परिचारिका आणि दोन्ही वैमानिक अशा पाच जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा…

अपघातग्रस्त विद्यार्थिनीला सुनेत्रा पवारांची तत्पर मदत:ताफा थांबवून रुग्णालयात दाखल केले, संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. अपघातग्रस्त तरुणीला पाहताच त्यांनी आपला ताफा थांबवला, तिची विचारपूस केली आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळोची एमआयडीसी रस्त्यावर एका विद्यार्थिनीला टेम्पोची धडक बसली. धडकेनंतर ती वाहनासह रस्त्यावर पडून जखमी झाली होती. त्याचवेळी विकासकामांच्या पाहणीसाठी जाणारा सुनेत्रा पवार यांचा ताफा तेथून जात होता. अपघाताचे दृश्य दिसताच त्यांनी त्वरित गाडी थांबवून घटनास्थळी धाव घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.