Headlines

राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप:म्हणाले- कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, 'सात-बारा कोरा'चा दावा फोल




स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेवर गंभीर टीका केली आहे. ही योजना शेतकऱ्यांची फसवणूक असून, ‘सात-बारा कोरा’ करण्याच्या दाव्याचा फुगा फुटल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला राज्यातील शेतकऱ्यांचा सात-बारा पूर्णपणे कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात थकीत कर्जदारांना केवळ २ लाख रुपये आणि नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले. हा कोट्यवधी कर्जदार शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचे शेट्टी म्हणाले. गेल्या आठ महिन्यांत राज्य सरकारने जिल्हा बँका आणि विविध कार्यकारी विकास सोसायट्यांकडून तब्बल ११ वेळा शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती गोळा केली. एवढी छाननी करूनही आठ महिन्यांनंतर पहिल्या दिवशी केवळ ५०० शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या संथ गतीवर शेट्टी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्य सरकारच्या तिजोरीत शेतकऱ्यांसाठी पैसे शिल्लक नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. केवळ योजनांच्या जाहिराती करून वेळ मारून नेण्याचे काम सुरू असून, पैशांअभावीच सरकार याद्या लांबवून चालढकल करत असल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. लांबलेला पाऊस, खतांचे वाढलेले दर आणि बाजारपेठेतील महागाई यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत तातडीने सरसकट कर्जमाफी देऊन दिलासा देणे आवश्यक असताना सरकार वेळकाढूपणा करत असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. प्रशासकीय चालढकल थांबवून तातडीने सर्व पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर करून बँक खात्यात पैसे जमा न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडेल, असे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा,, बारामतीत दिवंगत अजित पवारांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण:सुनेत्रा पवारांकडून अभिवादन, छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले. नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबीय, जय पवार आणि अनेक समर्थक उपस्थित होते. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवारांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी छायाचित्र प्रदर्शनाला भेट देत अजित पवार यांच्या बालपणापासून ते राजकीय कारकिर्दीपर्यंतच्या विविध टप्प्यांचे दर्शन घडवणारी छायाचित्रे पाहिली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *