Headlines

Model Riya Ahir Viral Video; Mumbai Student Protest Police Van Blocked


मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनसमोर ठामपणे उभे राहत ती रोखणारी 27 वर्षीय मॉडेल रिया अहिर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवाजी पार्क परिसरातील या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमां

.

व्हॅनसमोर का उभी राहिली?

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना रिया अहिरने सांगितले की, ती सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी पार्ककडे जात होती. त्यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी भरलेली पोलिसांची व्हॅन तिला दिसली. विद्यार्थ्यांना विनाकारण ताब्यात घेतल्याचे तिला वाटले आणि घोषणाबाजी ऐकताच ती धावत जाऊन थेट व्हॅनसमोर उभी राहिली.

तिने सांगितले की, पोलिसांशी तिची यावेळी जोरदार शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी काही अंतरावर नेल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडून देऊ, असे सांगितले. मात्र, तसेच करायचे असेल तर त्यांना तत्काळ का सोडत नाही, असा प्रश्न तिने पोलिसांना विचारला. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर पोलिसांकडे नव्हते, असा दावा तिने केला.

‘भीती वाटत होती, पण मागे हटले नाही’

रिया म्हणाली की, बाहेरून शांत दिसत असले तरी त्या क्षणी ती आतून प्रचंड घाबरलेली होती. तरीही विद्यार्थ्यांना सोडण्यात येईपर्यंत ती व्हॅनसमोरून हलली नाही. अखेर पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी तिचे आभार मानले. काहींनी तिच्याशी हस्तांदोलन केले, तर काहींनी गंमतीने तिला “बॅडी” अशी हाक मारल्याचेही तिने सांगितले.

तिच्या मते, जर विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन गेले असते तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असते. एक जबाबदार नागरिक म्हणून हस्तक्षेप करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना मनात असल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे तिने स्पष्ट केले.

इन्स्टाग्रामवरील पोस्टचीही चर्चा

घटनेनंतर रिया अहिरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हायरल झालेली पोस्ट शेअर करत, “बच्चों को भर तो लिया, अब कहाँ जाओगे?” अशी प्रतिक्रिया दिली. तिच्या या पोस्टलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

रिया अहिर कोण आहे?

रिया अहिर, जी समाजमाध्यमांवर ‘रिया एकौसिया’ या नावानेही ओळखली जाते, ही अभिनेत्री, मॉडेल, उद्योजिका आणि सूत्रसंचालिका आहे. सामाजिक आणि राजकीय विषयांवर ती स्पष्टपणे भूमिका मांडत असल्याने तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

मॉडेलिंग आणि अभिनयासोबतच ती ‘रियासत’ या लक्झरी कपड्यांच्या ब्रँडची संस्थापक आहे. या ब्रँडअंतर्गत ती हाताने तयार केलेले प्रीमियम पोशाख तयार करते. नृत्याचीही आवड असलेल्या रियाने ‘दिलबरा’ या संगीत व्हिडिओमध्ये काम केले असून तो फेब्रुवारी 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता.

याशिवाय तिने ‘दिदी (Crime and Justice)’ या लघुपटातही भूमिका साकारली आहे. दुर्गम भारतीय गावातील सामाजिक वास्तव आणि न्यायव्यवस्थेवर आधारित या चित्रपटात दोन माहितीपट निर्मात्यांच्या कथेद्वारे ग्रामीण जीवनाचे वास्तव दाखवण्यात आले आहे.

समाजमाध्यमांवर धाडसाचे कौतुक

मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या व्हॅनसमोर उभे राहण्याच्या रिया अहिरच्या कृतीचे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. अनेकांनी तिला धाडस आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक म्हटले आहे. “धैर्य विकत घेता येत नाही” आणि “ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे,” अशा प्रतिक्रिया विविध समाजमाध्यमांवर उमटत आहेत. या एका घटनेमुळे रिया अहिर राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आली आहे. शिवसेना उबाठा खासदार संजय राऊतांनीही त्या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर करत मुंबईची हिंमत अशी प्रतिक्रिया दिली होती.

हेही वाचा…

मुंबईची हिंमत! आंदोलकांनी भरलेली पोलीस व्हॅन अडवणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, संजय राऊतांनी केली पोस्ट

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दादरमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आंदोलकांना ताब्यात घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनासमोर एका तरुणीने उभे राहत वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर शेअर करत मुंबईची हिंमत अशी प्रतिक्रिया दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.