Headlines

मौनं सर्वार्थ साधनम्…:दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला‎ मौन धारण करून अण्णांचा पाठिंबा‎




गांधीवादी विचारांवर विश्वास ठेवणारे अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलनांत उपोषण, सत्याग्रह आणि मौन या अहिंसक मार्गांचा अवलंब केला आहे. त्यांच्यासाठी मौन म्हणजे निष्क्रियता नव्हे, तर व्यवस्थेच्या संवेदनांना जागवण्याचे प्रभावी साधन आहे. आवाज वाढविण्याऐवजी शांततेतून संदेश देण्यावर त्यांचा भर राहिला आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अण्णांनी बुधवारी मौन धारण करून पाठिंबा दर्शवला. आंदोलनकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी पोस्टर हातात घेतले होते. देशभक्तीपर गीतांमुळे वातावरण भारावून गेले होते. आंदोलनावेळी अण्णा भावूक शहरातील गांधी पुतळ्याजवळ अर्धा तास अण्णांनी मौन आंदोलन केले. यावेळी अण्णा भावुक झाल्याचे दिसून आले. अण्णांनी मौनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देतानाच सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता आंदोलकांशी संवाद साधावा, असा संदेश दिला. छाया : समीर मन्यार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *