Headlines

साईबाबांच्या समाधीवर बसले अभिनेते संजय मिश्रा:ग्रामस्थ आक्रमक,‎पालकमंत्री विखे पाटलांचे‎चौकशीचे आदेश‎




श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साईबाबांची भूमिका साकारणारे अभिनेते संजय मिश्रा श्री साईबाबांच्या समाधीवर बसल्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परंपरेनुसार समाधीवर पुजाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही बसण्यास मनाई असताना, या चित्रीकरणाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल विचारला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याची चर्चा असल्याने संस्थानच्या प्रशासकीय भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी हा प्रकार नकळत घडल्याचे सांगत, चित्रपटातील ते वादग्रस्त दृश्य तात्काळ हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी सकाळी उर्वरित पान ४



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *