Headlines

"इस्तीफा दो…’च्या घोषणांमुळे दणाणले रस्ते‎:काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर‎




दिल्ली येथील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याचे आज, गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही अमरावतीत पडसाद उमटले. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धरणे, निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. “धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो…’ विद्यार्थीयोंको न्याय दो…नरेंद्र मोदी हटाव-देश बचाव…अशा संतप्त आणि जोशपूर्ण घोषणांनी शहरातील जयस्तंभ चौक व संपूर्ण मार्केट परिसर दणाणून गेला होता. वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीने शहर बंदची हाक दिली होती. त्यानुसार या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी जयस्तंभ चौकातील तखतमल इस्टेट ही प्रमुख बाजारपेठ बंद केली. त्याचवेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याच चौकातील महात्मा गांधी यांच्या प्रतीमेला अभिवादन करुन बाजार ओळीत मोर्चा काढला. तर दुपारनंतर भाकप, माकप व इतर डाव्या पक्षांनी इर्विन चौकात निदर्शने करीत दिल्लीच्या घटनेचा निषेध नोंदवला. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्यामुळे दिल्लीच्या जंतर-मंतरवर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरु केले आहे. सदर गैरव्यवहाराला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेन्द्र प्रधान जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. पुढे याच मागणीसाठी त्यांनी संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यामुळे सध्या देशभर वातावरण तापले आहे. गेल्या तीन दिवसांपासून अमरावतीतही निषेधाचे स्वर उमटत आहेत. याच साखळीत गुरुवारी काँग्रेसने जयस्तंभ चौक येथे धिक्कार आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध केला. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलु शेखावत, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, महानगरपालिका विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शहरातील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस, सेवादल, ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक विभाग, सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्यासह प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. याच मागणीला धरुन दुपारनंतर डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ निदर्शने केली. भाकप, माकप, आयटक, सिटुूसह विविध जन संघटनांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी आणि दोषी प्रशासनावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य अशोक सोनारकर, जिल्हा सहसचिव डॉ.ओमप्रकाश कुटेमाटे, तालुका सचिव निळकंठ ढोके, शहर सचिव सुनील घटाळे व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रमेश सोनुले, राज्य कौन्सिल सदस्य सुभाष पांडे,राजेंद्र भांबोरे, सुनील देशमुख, पद्माताई गजभिये यांनी केले. सदर आंदोलनामध्ये जे एम कोठारी, लताताई सोनारकर अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. कैलास चव्हाण, दिगंबर नगेकर, लक्ष्मण धाकडे,अशोकराव राऊत आदी सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *