![]()
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना”” ही ऐतिहासिक ठरली आहे. यामुळे अकोला जिल्ह्यासह राज्यातील बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळून संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल, अश
.
आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की, कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेत ५० हजार रुपयांच्या लाभाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, शहराध्यक्ष जयंत मसने, महापौर शारदाताई खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, गिरीश जोशी, माधव मानकर, अंबादास उमाळे, उपमहापौर अमोल गोगे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. वैनगंगा-नळगंगा सारख्या नदीजोड प्रकल्पांद्वारे अवर्षणप्रवण भागांत पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू असून सुमारे २४ नवी धरणे आणि १६ जुन्या धरणांची उंची वाढवण्याचे काम वेगाने सुरू आहे.