![]()
विश्व मांगल्य सभा व मातोश्री नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुष्प वाटिका व हरितघास (लॉन) विकास अभियान’ उत्साहात सुरू करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील मातोश्री उद्यानात विविध प्रकारची फुलझाडे, औषधी वनस्पती आणि सुंदर हरित क्षेत्राचा (लॉन) विस्तार करून उद्यानाला अधिक नयनरम्य, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक स्वरूप देण्याचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमात अण्णासाहेब मिटकरी, सुभाष मोहोकार, जयप्रकाश पाटील, सुभाष गावंडे, सुभाष देशमुख, जयप्रकाश राठी, ज्योती राठी, नवल टावरी, हरिदास ताठे आदींनी सहभाग नोंदवून सहकार्य दिले. कार्यक्रमाचे नियोजन कोकिळा पाटील यांनी केले. याप्रसंगी विश्व मांगल्य सभेच्या महानगर अध्यक्षा निशा टावरी, सचिव वर्षा हुपेले, कोषाध्यक्ष मंजूषा रेलकर, संघटक अश्विनी जकाते, सहसचिव गिरिजा जाहगीरदार, संपर्क प्रमुख रंजना बिजवे, बालसभा प्रमुख रुपाली काळे व योग साधिका कल्पना बिडवे उपस्थित होते. यासोबतच विश्व मांगल्य सभा महानगर उपाध्यक्षा डॉ. अनघा देशपांडे, वर्षा मिटकरी, अनिता राजगुरे, यशश्री राठी, मनीषा अंबरखाने, राजश्री सारडा, संगीता अग्रवाल, श्रद्धा कोठारी, प्रणिता पांडे, योगिनी देवस्थळी, सुषमा ठोकळ यांच्यासह मुक्ताई व नवदुर्गा सभा आणि धर्म संस्कृती विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी या सेवाकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या अभियानाचा मुख्य उद्देश उद्यानाला रंगीबेरंगी फुलांनी सजवणे, वनस्पतींचे रोपण करून परिसरातील वाढते प्रदूषण कमी करणे आणि वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे हा आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासोबतच वरिष्ठ नागरिकांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली वृक्षसंवर्धनाची आणि वृक्षारोपणाची संस्कृती भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.या अभियानासाठी काही खास स्लोगन तयार करण्यात आले आहेत. अभियानाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. विविध रंगीबेरंगी फुलझाडे लावून उद्यानाला नयनरम्य रूप देणे. तुळशी, कोरफड यांसारख्या विविध गुणकारी औषधी वनस्पतींची लागवड करणे. हरित घासाचा (लॉन) विस्तार करून परिसरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे व हवेची गुणवत्ता सुधारणे. ज्येष्ठाच्या अनुभवाचा लाभ घेऊन निसर्ग संवर्धनाची परंपरा कायम ठेवणे.
Source link
मातोश्री उद्यानात रोपण करणार औषधी वनस्पतींसह फुलझाडे:विश्व मांगल्य सभा, मातोश्री नागरिक संघाचे हरितघास विकास अभियान सुरू