Headlines

कोरलेल्या आभूषणांनी उजळले विठ्ठल मूर्तीचे सौंदर्य:संशोधकांच्या अभ्यासातून मूर्तीचे प्राचीन वर्णन, सावळा विठुराया वारकऱ्यांचे जीवनसर्वस्व




पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिरात विराजमान असलेले सावळे परब्रह्म श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे सौंदर्य, तिची जडणघडण आणि वैशिष्ट्ये नेहमीच भाविकांसाठी औत्सुक्याचा विषय राहिली आहेत. संशोधकांनी समक्ष केलेले निरीक्षण व महापूजेच्या वेळी पुजाऱ्यांकडून सांगितले जाणारे वर्णन यांवरून मूर्तीची सविस्तर रूपरेषा संशोधनाचा विषय आहे. विठ्ठलाचे हे रूप अत्यंत प्राचीन, शिल्पशास्त्राच्या दृष्टीने अद्वितीय व भक्तिभावाने नटलेले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आबासाहेब भाटे यांनी ‘बरवे बरवे पंढरपूर’ या ग्रंथातून विठ्ठल मूर्तीचे सौंदर्य टिपले आहे. मूर्तीला थेट स्पर्शाची अनुभूती विठ्ठलमूर्ती संपूर्ण भारतात वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण इथे सर्व भाविकांचा मूर्तीला थेट स्पर्श होतो. त्याचा परिणाम म्हणून मूर्तीची झीज होते. मूर्ती आजही अतिशय सुरक्षित असून, शेकडो वर्षे जतन करण्यासाठी तिला कोटिंग आवश्यक आहे. त्यामुळे मूळ रूपाला बाधा येणार नाही. ही विठ्ठलाची मूर्ती मानवतेचा प्रेरणास्रोत आहे. – विलास वहाने, सहा. संचालक, पुरातत्त्व विभाग अलंकार व भूषणे मनगटावर कडी आणि दंडावर कोपराजवळ सुंदर बाहुभूषणे आहेत. कानांत ‘मकरकुंडले’ असून ती खांद्यावर आडवी टेकलेली आहेत. गळ्यात कंठा असून त्याच्या मध्यभागी छातीवर रुळणारा देखणा ‘कौस्तुभमणी’ आहे. संशोधकांच्या अभ्यासातून मूर्तीचे प्राचीन वर्णन, सावळा विठुराया वारकऱ्यांचे जीवनसर्वस्व वस्त्र व कटिबंध कमरेला स्वतंत्र वस्त्र नसून कडदोऱ्याचा गोंडा दोन्ही पायांच्या घोट्यापर्यंत दिसतो. पोटावर त्रिवळी असून कमरेला कमरबंद. वस्त्र, समचरण मुद्रा मूर्तीचे दोन्ही चरणकमल अत्यंत समतल असून दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतात व दाही बोटे सरळ रेषेत आहेत. या पावन रचनेलाच ‘समचरण’ म्हणतात. मूर्ती एका दगडी चौकोनी स्तरावर उभी आहे. हातातील वस्तू डाव्या हातात ‘शंख’ धारण केलेला आहे, तर उजव्या हातात लांब देठाची ‘कमलकलिका’ आहे. या देठाची लांबी जवळपास पायापर्यंत पोहोचते. मुद्रा, हस्त अन् आभूषणे, कटीवर दोन्ही हात मूर्तीचे दोन्ही हात कटेवर शरीर पातळीत ठेवलेले आहेत. बोटे मुठीप्रमाणे वळवलेली असून डाव्या हाताचा अंगठा वरच्या बाजूला तर उजव्या हाताचा अंगठा खालील बाजूला आहे. मस्तक व मुकुट मूर्तीचा चेहरा किंचित उभट असून डोक्यावर विशिष्ट प्रकारचा टोप आहे. हा टोप पारशी लोकांच्या टोपीसम किंवा विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय व चालुक्य सम्राट पुलकेशीन यांच्या मुकुटाशी साधर्म्य दर्शवणारा आहे. या टोपाच्या तळाशी कांगोरा कोरलेला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *