![]()
नीट पेपरफुटी प्रकरणी न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर राज्यभरात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत पोलिसांच्या कारवाईला ‘दिल्लीच्या पोलिसांपेक्षाही क्रूर’ म्हटले आहे. विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा ही दडपशाही सरकारच्या अंगलट येईल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न- पवार गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्या समजून घेण्याऐवजी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल (FIR) केले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत लिहिले आहे की, आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणाईचा आवाज दडपण्यासाठी आपल्या विभागाने विद्यार्थ्यांवर FIR करण्याचा जो सपाटा लावला आहे, तो कदापि योग्य नाही. तुमचे हे वागणे दिल्लीच्या क्रूर पोलिसांपेक्षाही अधिक क्रूर आहे. हा सरकारचा गोड गैरसमज विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याने ते घाबरतील आणि आंदोलन थांबवतील, असे जर सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा केवळ गोड गैरसमज आहे, असे पवार यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी पुढे लिहिले, सरकारने या गैरसमजातून बाहेर पडावे आणि मुंबईसह राज्यभरात आज विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात जे FIR दाखल केले आहेत ते त्वरित मागे घ्यावेत. अन्यथा, ही दडपशाही सरकारच्याच अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. अजितदादांच्या प्रकरणाची आठवण, पोलिसांवरही निशाणा रोहित पवार यांनी या निमित्ताने अजित पवार यांच्या प्रकरणाचीही सरकारला आठवण करून दिली. ते म्हणाले, “अजितदादांच्या अपघात प्रकरणी FIR व्हावा यासाठी आम्ही कायम विनंती करत आलो आहोत, परंतु त्याबाबतीत कधी FIR करण्याची हिंमत या सरकारने दाखवली नाही.” तसेच, पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “आम्हाला पोलिसांचा आदर आहेच, परंतु राजकीय दबावापोटी जर पोलीस विद्यार्थ्यांवर FIR दाखल करणार असतील, तर आम्ही देखील गप्प बसणार नाही, हे पोलिसांनीही लक्षात ठेवावे,” असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. हेही वाचा.. सोनम वांगचुक यांनी 27 व्या दिवशी उपोषण सोडले: मंत्री नड्डा मध्यरात्री 12.30 वा. मेदांतात, ज्यूस पाजला; CJP समर्थकांनी बॅरिकेड्स तोडले, आंदोलन सुरूच पेपरफुटीविरोधात उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी २७ व्या दिवशी उपोषण सोडले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांनी वांगचुक यांना सरबत पाजून त्यांचे उपोषण सोडवले. वांगचुक यांनी उपोषण संपवल्याबद्दल कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा
Source link
रोहित पवारांचा पोलिसांच्या भूमिकेवर संताप:म्हणाले- अजितदादांच्या अपघात प्रकरणी FIR ची हिंमत दाखवली नाही, अन् विद्यार्थ्यांवर कारवाई?