Headlines

BJP MLA Narayan Kuche Criticizes Thackeray Brothers Over Mumbai Morcha


ठाकरे बंधूंच्या 26 जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरत असले तरी त्यामागे

.

जालन्यात माध्यमांशी बोलताना कुचे म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले? आता महाराष्ट्रात त्यांना कोणी विचारत नसल्यामुळे ते दिल्लीतील आंदोलनाच्या मुद्द्यावरून मुंबईत मोर्चा काढत आहेत. त्यांची लोकप्रियता संपली असून हा मोर्चा केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आहे. 26 जुलैला त्यांच्या मोर्चाला किती प्रतिसाद मिळतो, हे सर्वांनाच दिसेल.”

न्यायालयावर टीका करणे योग्य नाही

उद्धव ठाकरे यांनी न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावरही कुचे यांनी आक्षेप घेतला. “न्यायालयावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. न्यायालयावर टीका करणे हे संविधानाच्या चौकटीत योग्य नाही,” असे ते म्हणाले.

पेपरफुटी दुर्दैवी, पण आंदोलनाचीही मर्यादा असावी

नीट पेपरफुटी प्रकरणावर बोलताना कुचे म्हणाले की, पेपरफुटीचे कोणताही जबाबदार व्यक्ती समर्थन करू शकत नाही. मात्र आंदोलनही लोकशाही मार्गाने आणि जबाबदारीने झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी व्हावी, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणात निश्चित न्याय मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘भाजप लुटारूंची टोळी’ टीकेला प्रत्युत्तर

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला “लुटारूंची टोळी” म्हटल्याच्या टीकेलाही कुचे यांनी प्रत्युत्तर दिले. “भाजप लुटारू आहे, असे म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कारभाराचा हिशेब द्यावा. मातोश्रीवर काय चालत होते, हे जनतेला माहिती आहे. राज्यात झालेला विकास सर्वांसमोर आहे. त्यामुळे अशा आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असा पलटवार त्यांनी केला.

राहुल गांधींच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह

राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांनी कानात सरकारविरोधात बोलल्याचा दावा केल्याबाबतही कुचे यांनी शंका व्यक्त केली. “राहुल गांधी इतके लोकप्रिय आहेत की पोलीस त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी सांगतील, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न वाटतो,” अशी टीका नारायण कुचे यांनी केली.

संबंधित बातमी वाचा..

राहुल गांधींची नौटंकीच, विद्यार्थ्यांचे आंदोलन मात्र योग्य:बावनकुळे यांचा पुनरुच्चार, कर्जमाफीसह पोलिस कारवाईवरही दिली माहिती

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील आणि देशातील विविध महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर सरकारची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीवरून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यात राहुल गांधींचा सहभाग, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आणि पोलिसांच्या वादग्रस्त कारवाया या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.