Headlines

विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा निषेध:पैठणमध्ये काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन




नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ परीक्षेच्या मुद्द्यावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सतीश पेंडसे यांना सुपूर्द करण्यात आले. हे आंदोलन तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश मुळे व शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पार पडले. या वेळी दिल्लीतील पोलिसी कारवाईचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला. तसेच ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी व इतर नेत्यांवरील कारवाईचाही निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष रमेश मुळे, शहराध्यक्ष हसनोद्दीन कट्यारे, अज्जु कट्यारे, राकेश लोंधे, मुक्तार पठाण, अंबादास ढवळे, किशोर दसपुते, रवींद्र आम्ले, संभाजी काटे, युनुस पठाण, रियाज गाजी, अमन काझी, शेख फय्याज, महेश पवार, आदिल कट्यारे, माजेद खलिफा, आशिष पवार, खाजा कुरेशी, हनिफ कुरेशी, तौफिक शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *