Headlines

हेल्मेट सक्ती:पहिल्याच दिवशी 445 दुचाकीस्वारांना दणका




शहर पोलिसांनी शुक्रवारपासून शहरात दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, आज (दि. २४) पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न सुमारे ४४५ जणांवर पोलिसांनी दंडात्मक (तडजोड रक्कम) कारवाई केली. दरम्यान, कायद्याच्या धाकामुळे सध्या हेल्मेट खरेदीसाठी दुचाकीस्वारांनी शहरातील दुकानांमध्ये मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. रस्ते अपघातांमध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यातही दुचाकी अपघातांतील सुमारे ६० टक्के मृत्यू हे केवळ हेल्मेटचा वापर न केल्यामुळे होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी दुचाकीस्वारांसह त्यांच्या मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. शहरात पोलिसांनी हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला असून तो निश्चितच योग्य आहे. कारण यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत होत आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पोलिसांवरही कारवाई ^आज वाहतूक शाखेने शहरात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या ४४५ दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबतच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुध्दही कारवाई करण्यात आली आहे. – संजय खताळे , एसीपी, वाहतूक शाखा, अमरावती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *