Headlines

ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांना ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार:रविवारी साईबनमध्ये सोहळा, सिंधु फटाले यांना ‘मातृशक्ती सन्मान’‎




ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही नागनाथ फटाले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त (नवती सोहळा) मानकन्हैय्या ट्रस्टच्यावतीने त्यांना ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ तर त्यांच्या पत्नी सिंधु फटाले यांच्या ८६ व्या पदार्पनानिमित्त त्यांना ‘मातृशक्ती सन्मान’ प्रदान करण्यात येत आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली. हा संयुक्त नवती व सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा रविवारी सकाळी ११ वाजता साईबन, एमआयडीसी येथे होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘दिव्य मराठी’चे स्टेट हेड सॅटेलाईट सुभाष बोंद्रे भूषवतील. तसेच छत्रपती संभाजीनगरचे युरोलॉजिस्ट डॉ. पुरुषोत्तम दरख यांची विशेष उपस्थिती असेल, अशी माहिती ट्रस्टच्या उपाध्यक्ष डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली. नागनाथ फटाले हे मराठवाड्यातील विकास पत्रकारितेचे प्रणेते मानले जातात. स्व. गोविंदभाई श्रॉफ यांच्या जनता विकास परिषदेच्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. त्यांनी पत्रकारितेला समाजपरिवर्तनाचे साधन मानून अविकसित भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठवाडा विद्यापीठात त्यांनी विद्यार्थ्यांना वृत्तलेखन व विकास पत्रकारितेचे धडेही दिले आहेत. तर सिंधु फटाले यांनी शिक्षण व ग्रंथांमार्फत हजारो विद्यार्थिनींना घडवले आहे. लग्नानंतर स्वतःच्या कर्तृत्वावर एमए पर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शारदा मंदिर कन्या प्रशालेत ग्रंथपाल म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श ग्रंथपाल पुरस्कार’ही मिळालेला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *