Headlines

दोन महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याचा चावा, ‘रेबीज’ने बालकाचा मृत्यू:एक तपाने मुलगा झाला, तोही गेला, वडील कॅन्सरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये




भवानी पेठेतील ज्योती अन् योगिराज स्वामी या दाम्पत्याला लग्नानंतर एका तपाने मुलगा झाला. कोडकौतुकाने वाढला. शाळेत चालला. परंतु दोन महिन्यांपूर्वी त्याला भटक्या कुत्र्याने चावले. ही बाब त्याने आई, वडिलांना सांगितलीच नाही. दोन दिवसांपूर्वी त्याला त्रास सुरू झाला. जीभ बाहेर काढत होता.त्यातून लाळ गळत होती.हात-पाय वाकडे करून तो निपचित पडत होता. श्वानाप्रमाणे गुरगुरत होता.त्याला ‘रेबीज’ झाल्याचे निदान झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले. परंतु शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास त्याचा करुण अंत झाला. समर्थ असे त्याचे नाव. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याचे वडील योगीराज यांना कॅन्सर झाला. ते आता दुसऱ्या स्टेजमध्ये आहेत. घरात ते एका कोपऱ्यात बसून समर्थकडे हतबलतेने पाहात होते. तर आईने आर्त किंकाळी फोडून म्हणाल्या, ‘समर्था, आता कुणासाठी जगू रे बाळा…’ समर्थ हा वीरतपस्वी शाळेत चौथीत शिकत होता. तो हुशार आणि आईचा खूप लाडका होता. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वागण्यात बदल झाला. पाण्याजवळ गेला की घाबरायचा. जीभ बाहेर काढत हाेता. फिरणाऱ्या पंख्याला पाहून कोपऱ्यात जाऊन लपत हाेता. त्याचे हे विचित्र वागणे पाहून आई-बाबा घाबरले. भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वाेच्च अादेश, मनपाचे दुर्लक्ष
१९ मे २०२६ रोजी सर्वाेच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली.
भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी तीन महत्त्वाचे निर्णय दिले, पण अंमल नाही. कुटुंब सदस्य अन् संपर्कात अालेल्यांना अँटीरेबीज दिली रेबीज झाल्यानंतर वेळेत आवश्यक उपचार मिळाले नाहीत. यातच त्या बालकाच्या मृत्यू झाला. सुरक्षिततेसाठी त्या कुटुंबातील आणि आजूबाजूच्या परिसरातील त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांना अँटीरेबीजची लस दिली आहे. डॉ. राखी माने, आरोग्य अधिकारी मनपा 1 सार्वजनिक ठिकाणांवरून कुत्रे हटवणे : शाळा, कॉलेजेस, रुग्णालये, क्रीडा संकुल, रेल्वे स्थानके आणि बसडेपो यांसारख्या गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणांवरून सर्व भटक्या कुत्र्यांना पूर्णपणे हटवण्याचे आदेश. या ठिकाणांहून पकडलेल्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी केल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडता येणार नाही. निवारागृहात (शेल्टर होम)ठेवावे. 2 सामान्य भागातील कुत्र्यांसाठी नियम (नसबंदी व लसीकरण) : संवेदनशील ठिकाणे वगळता इतर सामान्य गल्लीबोळांतील भटक्या कुत्र्यांसाठी प्राणी जन्म नियंत्रण नियमावली लागू राहील. त्यानुसार महापालिकेने कुत्र्यांना पकडावे. त्यांची नसबंदी, जंतनिर्मूलन व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करावे आणि पुन्हा त्यांना त्याच परिसरात सोडून द्यावे. 3 हिंसक आणि आजारी कुत्र्यांना इच्छामणाची कायदेशीर परवानगी : जे भटके कुत्रे अत्यंत हिंसक (पिसाळलेले) झाले आहेत, मानवी जीवाला सतत धोका निर्माण करत आहेत किंवा गंभीर, बरे न होणाऱ्या आजाराने ग्रस्त आहेत, अशा कुत्र्यांना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून इच्छामरण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्याचे अधिकार मनपा आयुक्तांना दिले. ३ वर्षांत फक्त १७ हजार ६६० निर्बीजीकरण कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मनपाच्या पशुवैद्यकीय विभागाने गेल्या ३ वर्षांच्या कालावधीत १७ हजार ६६० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. त्यासाठी मनपाने २ कोटी ३३ लाख १० हजार १४० रुपये खर्च केले. या कामाचा मक्ता नंदूरबार येथील नवसमाज निर्माण संस्थेला देण्यात आले होते. तीन वर्षांसाठी देण्यात आलेल्या या ठेक्याची मुदत आता संपत आली असून, पुन्हा नव्याने फेरनिविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, एवढा खर्च करूनही भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *