Headlines

दमदार पावसाची प्रतीक्षा:मागील नऊ दिवसांत मराठवाड्यातील धरणसाठ्यात केवळ 0.18 टक्के वाढ




मराठवाड्यात मागील आठवडाभरात झालेल्या पावसानंतरही ४४ धरणे व मोठ्या प्रकल्पांमधील ३१.७० टक्के पाणीसाठा कायम आहे. मागील ९ दिवसांत या धरणांमध्ये केवळ ०.१८ टक्के पाणीसाठा वाढला आहे. जायकवाडी आणि इसापूर या धरणांचा साठा वाढला, तर ६ धरणांचा साठा १ ते २ टक्क्यांनी घटला आहे. मराठवाड्यात जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा येऊनही दमदार पाऊस नसल्याने भविष्यात पाणी प्रश्‍न गंभीर होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी धरणातील पाणीसाठ्यात मोठा परिणाम झालेला नाही. मराठवाड्यातील ४४ धरणे व प्रकल्पांचा उपयुक्त पाणीसाठा ४५०८ दशलक्ष घनमीटर आहे. २४ जुलै रोजी १४२९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे ३१.७० टक्के पाणीसाठा होता. नऊ दिवसांपूर्वी या प्रकल्पांमध्ये ३१.५२ टक्के साठा असल्याची नोंद होती. दमदार पावसानंतरही केवळ ०.१८ टक्केच पाणीपातळी वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *