Headlines

धर्मेंद्र प्रधान हेच पेपरफुटीचे मुख्य आरोपी:राजीनामा द्यावाच लागेल, संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल




नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात उफाळून आलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पेपरफुटीचे मुख्य आरोपी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली. तसेच, राज्यातील वाढता जनक्षोभ पाहता मंत्री, खासदार आणि विशेषतः ‘गद्दार’ आमदारांनी घराबाहेर पडू नये, असा खोचक आणि थेट इशाराही त्यांनी दिला आहे. ‘धर्मेंद्र प्रधान हेच मुख्य आरोपी’ संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना थेट शिक्षणमंत्र्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, “नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हेच मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, त्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल.” हा विषय आता केवळ एका ‘कॉकरोच जनता पार्टी’पुरता किंवा विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक गंभीर राष्ट्रीय विषय बनला आहे. रस्त्यावरील तरुणांप्रमाणेच लोकसभा आणि राज्यसभेतील संपूर्ण विरोधी पक्षही शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागत असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांना टोला अन् मोहन भागवतांना आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे म्हटले होते. यावर पलटवार करताना राऊत म्हणाले, “नव्या कायद्याची गरजच काय? आपल्याकडे आधीपासूनच यासाठी कायदे अस्तित्वात आहेत, फक्त त्यांच्या अंमलबजावणीची गरज आहे.” तसेच, देशातील सद्यस्थिती पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता थेट पंतप्रधानांचाच राजीनामा मागायला हवा, अशी मागणीही राऊत यांनी केली. शिंदेंच्या ताफ्यावर निशाणा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सुरक्षेवरही राऊतांनी टीका केली. “आजकाल शिंदेंचा ताफा एवढा मोठा असतो की, तेवढा ताफा तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचाही नसतो,” असा टोला त्यांनी लगावला. “बाहेर वादळ घोंगावतंय, गद्दारांनी भूमिगत व्हावे दरम्यान, संजय राऊत यांनी एक ट्विटही केले आहे, यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत राऊत यांनी राज्यातील सत्ताधारी आणि बंडखोर आमदारांना एक मोठा इशारा दिला आहे. “गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींनी घेतलेले निर्णय किती ‘व्हिजनरी’ आहेत, हे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पाहिल्यावर कळतेच,” असा टोला मारत राऊत पुढे म्हणाले, “माझी सर्व सरकारी मंत्री, आमदार आणि खासदारांना नम्र विनंती आहे की, त्यांनी आता बाहेर फिरू नये. घरीच राहा, विनाकारण धोका पत्करू नका. कारण बाहेर जनतेच्या संतापाचे मोठे वादळ घोंगावत आहे. विशेषतः ज्या गद्दार मंडळींनी बंडखोरी केली, त्यांनी तर आता थेट भूमिगतच व्हावे!” अशी पोस्ट राऊत यांनी केली आहे. हेही वाचा.. CJP म्हणाली- प्रधानांनी राजीनामा दिला नाही, तर बैठकीला अर्थ नाही:पोलिसांनी जंतरमंतरवरील बॅरिकेडिंग वाढवली; आंदोलकांनी दिला होता कारवाईचा इशारा ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) प्रवक्ते आशुतोष रांका यांनी स्पष्ट केले की, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सरकारशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या CJP आणि सरकार यांच्यातील तिसरी बैठक शनिवारी दुपारी ३:३० वाजता होण्याची शक्यता आहे. या बैठकीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी अपेक्षा आहे.
अवघा रंग एक झाला!: राज्यभरात आषाढी एकादशीचा भक्तीमय उत्साह, पंढरीत भाविकांचा महासागर आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासूनच राज्यभरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज पहाटे पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी त्यांनी ‘राज्यात चांगला पाऊस पडून पीक बहरू दे आणि महाराष्ट्र समृद्ध होऊ दे,’ अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी केली. राज्याच्या इतर भागांतही आषाढीचा मोठा उत्साह दिसून येत असून विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी जमली आहे. अनेक शहरे आणि गावांमध्ये पालखी तसेच दिंडीचे आयोजन करून विठूनामाचा जयघोष केला जात असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *