Headlines

डीजे, लेझर लाईट नियमांचे पालन करा:'आम्ही अमरावतीचे लोक' संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले




अमरावती येथील लोकशाही-संविधानवादी जनसंघटना समन्वय मंचने बुधवारी, 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन दिले. डीजे आणि लेझर लाईटच्या वापराबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सभा, मिरवणुका, शोभायात्रा आणि लग्न समारंभांमध्ये डॉल्बी-डीजेचा मोठा आवाज आणि लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन होते. याचा रुग्ण, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होतो. डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच, लेझर लाईटमुळे डोळ्यांची रेटिना जळून कायमस्वरूपी अंधत्व आल्याचीही अनेक प्रकरणे घडली आहेत. चर्चेदरम्यान या गंभीर बाबी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन करून योग्य ते निर्देश दिले. निवेदन देताना बाबा भाकरे, डॉ. प्रकाश मानेकर, प्रा. भाऊ सरकटे, प्रकाश कळसकर, प्रदीप पाटील, नितीन चौधरी, आशिष कडू, धर्मेंद्र भांडारकर, पंकज वैद्य, प्रवीण वासनिक, संतोष देशमुख, सुनील घटाळे आणि इतर सहकारी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की, सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर डीजे वाजवणाऱ्यांवर कायमस्वरूपी बंदी घालावी. तसेच, डोळ्यांना हानी पोहोचवणाऱ्या लेझर शो आणि लाईटच्या वापरालाही कायमची बंदी घालावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *