Headlines

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा…:वाळूजच्या प्रतिपंढरपुरात उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते रात्री 12 वाजता महापूजा




रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ एक नव्हे तर लाखो भाविकांच्या मनाची अवस्था या अभंगाप्रमाणे विठ्ठल दर्शनाने झाली. कारण आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा अपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा व अभिषेक पार पडला. खासदार संदीपान भुमरे यांनी पूजा केली. यावेळी उप महापौर राजेंद्र जंजाळ, सरपंच सुनील काळे आदींची उपस्थिती होती. या सोहळ्यानंतर रात्री १२.३० वाजता हजारो वारकऱ्यांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आले. आषाढीनिमित्त विठुरायाचा गाभारा सजवण्यासाठी पुण्याहून २ क्विंटल फुले आणण्यात आली. ९ कारागिरांनी १६ तास मेहनत घेत सजावट साकारली आहे. विविध फुलांनी गाभारा उजळून निघाला आहे. प्रथम दर्शनाने मन भरून आले; धन्य समजते “पंढरपूर येथे सावळ्या विठ्ठल-रुक्मिणींच्या प्रथम दर्शनाचा लाभ मिळाला. हे मी माझे परमभाग्य समजते. विठूरायाच्या चरणी माथा टेकताना मन अगदी भरून आले आणि स्वतःला धन्य समजते. विठ्ठल-रुक्मिणींची हीच कृपा सर्व भाविकांवर कायम राहो, हीच प्रार्थना. – प्रतीक्षा उमप, (प्रथम दर्शन घेणाऱ्या महिला भाविक, सिडको महानगर) पहिल्यांदाच उद्योगमंत्री सामंत पूजेला वाळूज औद्योगिक पट्ट्यातील मंदिराला ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. यंदा पहिल्यांदाच राज्याचे उद्योगमंत्री महापूजेला आल्यामुळे रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल आणि आवश्यक निधीचा मार्ग मोकळा होईल, असा सार्थ विश्वास मंदिर ट्रस्टने व्यक्त केला आहे. १५ वर्षांपासून अविरत पुष्पसेवा रामेश्वर लघाने पाटील आणि त्यांचे कुटुंब गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीला मंदिराच्या सजावटीची सेवा देत आहेत. “उत्तम दर्जाची फुले आणण्यापासून आकर्षक तोरणे व डिझाइन्स बनवण्याचे काम सलग १६ तास सुरू होते. विठुरायाची सेवा करण्याची संधी मिळणे, हे आमचे भाग्यच आहे,” अशी कृतज्ञतेची भावना लघाने यांनी व्यक्त केली. हेही वाचा.. …आणिक दर्शन विठोबाचे!:पंढरपुरात पहाटे 3 वा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा; सलग 20 वर्षे वारी करणाऱ्या धाराशिवच्या माने दांपत्याला पूजेचा मान श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व मानाचे वारकरी दांपत्य यांच्या हस्ते परंपरेनुसार ही पूजा झाली. यंदा मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगांवच्या बाबासाहेब माने (वय ७०) व प्रभावती माने (वय ६८) या वारकरी दांपत्यास मिळाला. शेतकरी असलेले माने दांपत्य गेल्या २० वर्षांपासून पंढरपूरची वारी करते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *