Headlines

अन्नत्याग आंदोलन मागे:विद्यार्थ्यांनी सकाळी फुंकले रणशिंग; संध्याकाळी सांगता, नीटसह भरतीतील गैरप्रकारांवर तरूणाई आक्रमक‎




एमपीएससी, युपीएससी, नीट, एसएससी,शिक्षक भरत, विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार, परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी रणशिंग फुंकले. मात्र संध्याकाळी मागण्या मान्य झाल्याने अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारविरोधात निर्णायक आंदोलनाचा बिगुल वाजवत तरुणाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटली होती. रोज एका विद्यार्थ्यांने उपोषण करीत अन्य युवक या अन्नत्याग सहत्याग्रहात सहभागी झाले होते. दिवसभर सत्याग्रह करीत रात्रीचा मुक्कामही रस्त्याच्या कडेलाच असलेल्या आंदोलनस्थळी करण्याचे नियोजन होते. मात्र आंदोलन मागे घेण्यात आले. नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थी, युवकांवर दिल्ली येथे लाठीचार्ज करण्यात आला होता. परीक्षा व भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, पेपरफुटी, भ्रष्टाचार, भरतीतील . उर्वरित पान ४ शिक्षण व्यवस्थेमधील गैरव्यवहार, भ्रष्टाचारविरोधात वंचित बहुजन आघाडीने पक्ष म्हणून आक्रमक भूमिका घेत बंदची हाक दिली होती. या मुद्दांवर झालेल्या आंदोलनांमध्ये कांँग्रेस व शिवसेना (उबाठा ) दोन्ही पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले. मात्र या दोन पक्षांचे दोन आमदार जिल्ह्यात असूनही या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे विरोधक म्हणून रान उठवण्याची संधी गमावली. आंदोलनात सहभागी झाले; परंतु जिल्ह्यात या मुद्दांवर त्यांचे पक्ष स्वतंत्रपणे पक्ष म्हणून भूमिका घेताना दिसला असता तर विद्यार्थ्यांमध्ये वेगळा संदेश गेला असता. मात्र ही संधी वंचितने साधली आहे. आता अंमलबजावणीकडे लक्ष विविध परीक्षा, भरती प्रक्रियेत पादर्शकतेचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या अन्नत्याग आंदोनामुळे ऐरणीवर आला. नीट, टीईटी पेपरफुटी व भरती घोटाळे थांबण्याचे नाव घेत नसून, यातील दोषींवर कडक कारवाईसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांवरील कारवाई झाली. त्यामुळे ही कारवाई मागे घेण्यासह अन्याय थांबवा, शिक्षणाचे खाजगीकरण नको, आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत गरजेचे असल्याचे विद्यार्थी म्हणाले. शिक्षण व भरती व्यवस्थेमध्ये कालबद्ध सुधारणा आवश्यक असल्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला. आता या मागण्यांच्या अंमलबजावणीवरही विद्यार्थ्यांचा वॉच राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *