![]()
सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील दहा विभागांपैकी एकाही विभागात कायमस्वरूपी प्राध्यापक उपलब्ध नाही. सर्व विभागांचा कारभार सहायक प्राध्यापकांच्या भरवशावर सुरू असून, त्यातील तीन सहायक प्राध्यापक देखील कंत्राटी आहेत. अतिजोखीम शस्त्रक्रिया करताना अनेक अडचणी येत असून, शैक्षणिक कामकाजावर याचा थेट परिणाम होत आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग १ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू झाला होता. त्यानंतर कार्डियोलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, पॅथॉलॉजी, ॲनेस्थेसिया, यूरोलॉजी, नवजात शिशू विभाग आणि रेडियोलॉजी असे विभाग सुरू करण्यात आले. रुग्णालयात सहा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र २० खाटांचे आयसीयू आणि २०० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या सुविधा चालवण्यासाठी वरिष्ठ प्राध्यापकांचीच कमतरता आहे. वैद्यकीय शिक्षणावरही रुग्णांवरील उपचार, शस्त्रक्रिया, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करताना अंतिम निर्णय घेताना प्राध्यापकांची आवश्यकाता असते. सुपरस्पेशालिटीत ही सर्व जबाबदारी सहायक प्राध्यापकांवर आली आहे. यामुळे अडचणी येतात. ^कायमस्वरुपी प्राध्यापक नसल्याने अनेक अडचणी येतात. महत्वाच्या वेळी निर्णय घेतानाही अडचणी येतात. प्राध्यापकांची उपलब्धता झाल्यास पूर्ण क्षमतेने विभाग सुरू करता येतील. सुपरस्पेशालिटीमधील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सध्या सहाय्यक प्राध्यापकांच्या माध्यमातून दहा विभाग सुरु आहेत. – डॉ. संजय सोनुने, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. रुग्णसेवा प्रभावित हृदयविकार, मेंदूविकार, मूत्रपिंड, न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरीसारख्या केसेसमध्ये वरिष्ठ तज्ज्ञांची आवश्यकता असते. मात्र, प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने सर्व निर्णय कनिष्ठ स्तरावरील डॉक्टर घेत आहेत. कायमस्वरुपी पदे रिक्त असल्याने अनेक अडचणी प्राध्यापक का आवश्यक? अतिजोखीम शस्त्रक्रियांतील अंतिम वैद्यकीय निर्णय. गंभीर रुग्णांच्या उपचार पद्धती निश्चित करणे. सहायक व सहयोगी प्राध्यापकांना मार्गदर्शन. गुंतागुंतीच्या प्रकरणांत निर्णय प्रक्रियेला विलंब, यामुळे प्राध्यापकांची भरती आवश्यक आहे.
Source link
पदभरतीकडे दुर्लक्ष:"सुपरस्पेशालिटी'त दहाही विभाग प्राध्यापकांविना; शिक्षण प्रभावित, सहाय्यक प्राध्यापकांच्या खांद्यावर जबाबदारी