![]()
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. तेल्हारा येथील वान प्रकल्पात सर्वाधिक ६७.४० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर दुसरीकडे काटेपूर्णा (२५.२९%) आणि उमा प्रकल्पाच्या (४.५९%) क्षेत्रात अपुरा पाऊस झाल्याने तेथील साठा चिंताजनक आहे. सध्या आवक मर्यादित असल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांचे दरवाजे बंद ठेवण्यात आले असून धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग थांबलेला आहे. शहराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा धरण क्षेत्रात केवळ २०५ मिमी, तर उमा धरण क्षेत्रात अवघा ९० मिमी पाऊस झाला आहे. पावसाच्या या अत्यल्प प्रमाणामुळे उमा धरणात केवळ ४.५९ टक्के तर काटेपूर्णा धरणात २५.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दोन्ही धरणांची पाणी पातळी वाढण्यासाठी आगामी दिवसांत मोठ्या पावसाची गरज आहे. प्रकल्प पातळी साठा (दलघमी) (%) वान प्रकल्प ४०५.६० ५५.२४ ६७.४० मोर्णा प्रकल्प ३६४. २५ २५.६५ ६१.२६ दगडपारवा ३१५.६५ ०४.८९ ४७.९८ निर्गुणा प्रकल्प ३८६.७० १२.७५ ४४. १९ काटेपूर्णा ३४१.६० २१.८४१ २५.२९ उमा प्रकल्प ३३७.८० ०.५३६ ४.५९ वान प्रकल्प क्षेत्रात ५३३ मिमी तर मोर्णा प्रकल्प क्षेत्रात ४७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या भरपूर पावसामुळे वान धरणात ५५.२४ द.ल.घ.मी. तर मोर्णा धरणात २५.६५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. हे दोन्ही प्रकल्प ६० टक्क्यांहून अधिक भरले आहेत. अजून पाऊस झाल्यास ही धरणे पूर्ण क्षमतेने लवकर भरतील. वान, मोर्णात पुरेसा साठा
Source link
‘वान’ धरणात सर्वाधिक 67.40 टक्के पाणी:काटेपूर्णा व उमा धरण क्षेत्रात अल्प पाऊस; सर्व धरणांचे दरवाजे सध्या बंदच