Headlines

वैरागच्या विकासासाठी नगरपंचायत द्या- राऊत‎:उजनीच्या पाण्यामुळे उत्तर बार्शीचा चेहरा बदलला




सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही उत्तर बार्शी भागात उजनीचे पाणी पोहोचल्यामुळे या भागात दुष्काळाची तीव्रता जाणवत नाही. वैराग परिसरातील धरणांमध्येही उजनीचे पाणी आणण्यात यश आले. तर शेतीसह उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळेल, आणि वैरागच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला. वैराग व परिसरातील लिंगायत समाजाच्या वतीने शनिवारी (दि. २) आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी आमदार राऊत म्हणाले, बार्शी तालुक्यातील बहुतांश सत्तास्थाने आपल्या ताब्यात असतानाही वैराग नगरपंचायतीवर सत्ता नसल्याने अनेक विकासकामांमध्ये अडचणी येत असल्याचे नमूद केले. आगामी काळात वैरागच्या विकासासाठी नगरपंचायतही आपल्या ताब्यात द्या, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी चंद्रकांत घोंगडे होते. या वेळी वैरागचे नगरसेवक वैजीनाथ आदमाने, श्रीशैल्य भालशंकर, मोहन घोडके, गजानन घोटकर, सागर गावसाने, चंद्रकांत तावसकर, नंदकुमार देशमुखे यांच्यासह लिंगायत समाजातील महिला-पुरुष उपस्थित होते. सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी केले. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचाही सन्मान या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी रोंगे, उपसभापती संतोष निंबाळकर, बार्शीच्या नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, बाजार समितीचे सभापती विजय गरड, उपसभापती बाबा गायकवाड यांचा लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *