![]()
येथील जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या अटीतटीच्या आणि चुरशीच्या निवडणुकीत सुरेश शहा पॅनलचे अर्जुनराव बागल यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा ८ विरुद्ध ७ अशा एका मताने पराभूत करत बँकेच्या सत्तास्थानी पुन्हा एकदा बा
.
या चुरशीच्या निवडणुकीत बागल यांच्या विरोधात विजयसिंह परबत उभे होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुनराव बागल यांनी यापूर्वीही दोन वेळा बँकेचे अध्यक्षपद भूषवले आहे. सदर निवडणुकीत पॅनल प्रमुख माजी अध्यक्ष सुरेश शहा, दिलीप तळेकर, अर्जुनराव बागल, उपाध्यक्ष किरण दोशी, माजी उपाध्यक्षा सुलभा दिंडे (दास), संचालक विक्रम बोराडे, अरुण गिड्डे, समीर तरटे, विजयसिंह परबत, फुलचंद धोका, दिलीपचंद धोका, डाॅ. मोनिका शहा, अशोक खाडे, डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर, अनिल पाटील आदीं १५ संचालकांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया माढ्याचे सहायक निबंधक अनिकेत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली.
या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुनराव बागल यांचा ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. डॉ. राजेंद्र दास यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.