Headlines

Eknath Shinde Targets Opposition Over Drought Relief


“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सत्तेच्या कार्यकाळात भारताने आर्थिक महासत्तेकडे यशस्वी झेप घेतली आहे. 2014 पूर्वी जगात ‘फ्रॅजाईल फाईव्ह’मध्ये असलेला भारत आज टॉप पाच जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये दिमाखात उभा आहे. काँग्रेसच्या काळात झालेले 2ज

.

मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेबद्दल राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या अभिनंदनाच्या ठरावाची माहिती दिली. तसेच, राज्यातील 305 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी घेतलेले दिलासादायक निर्णय आणि दिल्लीतील विरोधकांच्या आंदोलनांमागील ‘आंतरराष्ट्रीय कारस्थाना’वर चौफेर हल्ला चढवला.

शेर कभी गिद्दडों से नहीं डरता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान म्हणून 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना खास शैलीत शायरी सादर केली.

“देश के खातीर जो हर पल जी जान से लडे, आंधी से भी जो बनकर चट्टान से खडे,

भौंकने वाले तो बस शोर ही उठायेंगे, पर शेर कभी गिद्दडों के शोर से नहीं डरे!”

त्यामुळे विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी पंतप्रधान मोदी आपल्या विकासाच्या मार्गावरून कधीही ढळणार नाहीत.

नया भारत आणि सर्जिकल स्ट्राईक

“पहलगाम हल्ल्यानंतर शत्रूच्या घरात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे धाडस या ‘नव्या भारता’ने दाखवले. पूर्वी सैनिकांची मुंडकी छाटली जायची आणि तत्कालीन सरकार केवळ कागदी पत्रव्यवहार करत बसायचे. मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे कलम 370चे उच्चाटन झाले आणि अयोध्येत भव्य प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले. भारतातील 32 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढणाऱ्या आणि 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देणाऱ्या या नेतृत्वाला जगातील ३६ देशांनी आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.”

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही

राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर सरकारने घेतलेल्या संवेदनशील निर्णयांची माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्री, मी स्वतः आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो होतो. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन सुरुवातीला 265 तालुके आणि त्यानंतर आणखी भर घालत एकूण 305 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी मदतीचे केंद्र व राज्य सरकारचे निकष आणि तांत्रिक टप्पे पूर्ण व्हायला वेळ लागतो. मात्र, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळत आहोत. एकूण मदतीपैकी तातडीने 5 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

12 सवलतींचे कवच

“दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली रोखणे, कर्जाचे पुनर्गठन करणे, विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करणे आणि पिण्याच्या पाण्याची व गुरांच्या चाऱ्याची सोय करणे या 12 प्रमुख सवलती युद्धपातळीवर लागू केल्या आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेला चारा शासन थेट हमीभावाने खरेदी करणार आहे. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क अन्नदाता बळीराजाचा आहे.”

सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढणे म्हणजे संविधानाचा खून

दिल्लीतील विरोधकांच्या आंदोलनावर आणि निवडणूक आयोगाविरोधातील भूमिकेवर त्यांनी अतिशय कठोर शब्दांत टीका केली. “हातात संविधानाचे पुस्तक घेऊन फिरणारे लोक प्रत्यक्षात संविधान पायदळी तुडवत आहेत. देशाच्या इतिहासात कधीही सर्वोच्च न्यायालयावर मोर्चे नेऊन सरन्यायाधीशांवर दबाव आणण्याचे हीन कृत्य घडले नव्हते. ही न्यायव्यवस्थेची उघड विटंबना आहे. देशात अशांतता, अस्थिरता आणि अराजकता निर्माण करण्याचा हा पूर्वनियोजित कट असून यामागे परदेशी शक्तींचा हात असण्याची दाट शक्यता आहे. देश तोडण्याची भाषा करणारे हे लोक देशप्रेमी नसून देशद्रोही आहेत.”

पराभवाची हॅट्रिक झाल्याने पोटदुखी

“गांधीनगर (गुजरात), तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेने पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएला (NDA) कौल दिला आहे. गांधीनगरमध्ये ‘आप’च्या (AAP) 32 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीत जनतेकडून पराभवाची हॅट्रिक पत्करावी लागल्यामुळेच ‘इंडिया’ आघाडीचे नेते वैफल्यातून अशी आंदोलने करत आहेत,” असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी लगावला.

——————————————————-

हेही वाचा…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची मदत: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी सणांची पार्श्वभूमी लक्षात घेत राज्य सरकारने बळीराजाला एक दिलासा दिला आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासोबतच, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनात ‘हेड ऑफ द स्टेट’ म्हणून २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठरावही मंजूर करण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.