Headlines

SIR वरून पसरवले जाणारे 8 गैरसमज, नेमकी वस्तुस्थिती काय?:विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीस मैदानात, जनतेला थेट आवाहन!




केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरात राबवण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेवरून (SIR) विरोधकांनी ‘मतचोरी’ आणि कोट्यवधी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत रान उठवले असतानाच, आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर (X/ट्विटर) सविस्तर माहिती प्रसिद्ध करत ‘गैरसमज विरुद्ध वस्तुस्थिती’ जनतेसमोर मांडली आहे. “कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी आजच मतदारयादीतील आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावेत आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क सुरक्षित ठेवावा,” असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेला केले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीपासून मुंबईपर्यंत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेविरोधात मोर्चे काढले आहेत. एआयच्या (AI) माध्यमातून परस्पर नावे कापली जात असल्याचा आरोप होत असताना, मुख्यमंत्र्यांनी मुद्देसूदपणे 8 प्रमुख आक्षेपांचे खंडन करत निवडणूक प्रक्रियेतील कायदेशीर बाजू स्पष्ट केली आहे. ‘SIR’ प्रक्रियेबाबत पसरवले जाणारे 8 गैरसमज आणि वस्तुस्थिती 1. पात्र मतदारांची नावे सरसकट कापली जातात का? 2. यादीतून नाव गेले तर पुन्हा नोंदणी अशक्य आहे का? 3. एआय (AI) संगणक प्रणाली परस्पर नावे वगळते का? 4. प्रत्येकाला सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात का? 5. एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असल्यास चालते का? 6. नवीन मतदारांना मोहीम संपेपर्यंत वाट पाहावी लागते का? 7. नाव आणि पत्त्यातील चुका सुधारता येत नाहीत का? 8. नाव वगळल्यास दाद मागता येत नाही का? राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे पाऊल महत्त्वाचे! निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेवरून विरोधकांनी रस्त्यावर उतरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट माहितीपर मोहिमेद्वारे विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता या स्पष्टीकरणानंतर तरी मतदारयादीवरील राजकीय वाद शमणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ————————————————————————– हेही वाचा… एकनाथ शिंदे नाराज नाहीत: विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, त्या 2 बैठकांच्या गैरहजेरीवर उदय सामंतांचा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहिल्यामुळे ते महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात मोठे उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चा केवळ अफवा असून, उपमुख्यमंत्री कोणत्याही कारणास्तव नाराज नसल्याचा स्पष्ट खुलासा राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी केला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, म्हणजेच ‘नंदनवन’ येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आगामी निवडणुकांची रणनीती आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमागचे कारण स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *