Headlines

हिंगोली नगरपालिकेचा मोठा निर्णय:अग्निशमन दलातील 'त्या' दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव




हिंगोली पालिकेतील अग्निशमन दलातील दोन कर्मचाऱ्यांचा आगीवर नियंत्रण मिळवितांना जीव गमवावा लागला. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव हिंगोली पालिकेने पाठविला असून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर होणार आहे. हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात सोमवारी ता. 5 रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फटाक्याच्या गोदामाला भिषण आग लागली होती. या आगीमध्ये 2 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये पालिकेच्या अग्निशमन दलातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, या कर्मचाऱ्यांवर तातडीने उपचार मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांना पालिकेकडून 1 लाख रुपयांची मदत जाहिर केली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी काही प्रमाणात का होईना आधार मिळाला होता. मात्र लातुर येथे उपचार सुरु असतांना पालिकेचे कर्मचारी दिलीप दोडके व आकाश सांगळे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालिका प्रशासनासह हिंगोली शहरावर शोककळा पसरली. शहरात आगीवर नियंत्रण मिळवितांना प्राणाची बाजी लागणारे कर्मचारी दिलीप दोडके व आकाश सांगळे यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी यासाठी पालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत. पालिकेच्या नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर, गटनेते श्रीराम बांगर यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव मुख्याधिकारी प्रांजली मुंढे यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला असून त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे सादर होणार आहे. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. शहरातील अतिक्रमणावर लवकरच हातोडा- मुंढे हिंगोली मुख्याधिकारी प्रांजली मुंढे म्हणाल्या की, शहरामध्ये अतिक्रमणावर लवकरच हातोडा पडणार आहे. शहरातील सार्वजनिक चौक, मुख्य रस्ते यावरील अतिक्रमण प्राधान्याने हटविले जाणार असून त्यानंतर शहरातील इतर ठिकाणावरील अतिक्रमणे काढली जातील. या शिवाय परवाना असलेल्या कंपनीमार्फत अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *