Headlines

Sambhajinagar Woman Suicide; Husband Posed As Government Officer


छत्रपती संभाजीनगरमधील हडको परिसरातील वानखेडेनगरमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. मुलगा सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करत लग्न केले. त्यानंतर काही दिवसांतच हा बनाव उघडकीस आला. त्यातच सासरी सतत हिणवणे सुरू झाले. लग्नानंतर अवघ्या चार महिन्

.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ( 13 ऑक्टोबर) सकाळी ती वरच्या मजल्यावरील खोलीत होती. काही वेळाने तिची सासू ओरडत खाली आली आणि तिने नीलेशला संजनाने वरच्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती दिली. सासरच्या मंडळींनी संजनाला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

नेमके काय घडले?

संजना नीलेश शेजवळ (23) असे विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात नोंद केली आहे. संजनाचे वडील व नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, संजनाचा विवाह 4 जून रोजी नीलेश शेजवळ याच्यासोबत झाला होता. लग्नापूर्वी नीलेश हा शासकीय नोकरीत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे उघडकीस आले. पतीची पोलखोल झाल्यानंतर संजनाला मोठा मानसिक धक्का बसला. फसवणुकीचे सत्य समोर आल्यानंतर सासरच्या मंडळींकडून संजनाचा मानसिक छळ सुरू झाला. स्वयंपाक करण्यापासून ते कपड्यांवरून तिला क्षुल्लक कारणांवरून सतत टोमणे मारणे आणि हिणवणे हा सासरच्या मंडळींचा नित्यक्रम बनला होता. लग्नापूर्वी नीलेशने, सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले होते. मात्र, तो वैद्यकीय शिक्षणासाठी मुलांना परदेशात पाठवणाऱ्या कन्सल्टन्सी संस्थेत काम करतो, असा आरोप विवाहितेच्या नातेवाइकांनी केला.

सासरच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

मृत्यूच्या आदल्या रात्री (12 ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास संजनाचे आईला फोन केला होता. छोट्या छोट्या गोष्टीवरून घरातील सदस्य टोमणे मारत असल्याचे असे तिने आईला सांगितले होते, असे तिच्या वडिलांनी सांगितले.

हे ही वृत्त वाचा

एफडीएची कारवाई:संभाजीनगरच्या बीड बायपासवरील‘केएफसी’त घाण; परवाना निलंबित, काळेकुट्ट ट्रे अन् कच्च्या-शिजवलेल्या मांसाची सरमिसळ

अन्न व औषध प्रशासनाने रविवारी बीड बायपासवरील शहानूरवाडी येथील ‘केएफसी’ उपाहारगृहावर छापा टाकला. किचनमधील अस्वच्छतेमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका असल्याचे उघडकीस आल्याने प्रशासनाने हॉटेलचा अन्न परवाना निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. सुरसे यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत ओव्हनमधील ग्रील व बेकिंग ट्रे अनेक दिवसांपासून न धुतल्याने काळेकुट्ट होते. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.