Headlines

डोक्यावरून आणलेल्या गंगा देवीचे कार्ल्यात श्रद्धेचे स्थान:नवरात्रोत्सवात दररोज भजन-कीर्तन व भंडारा; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी; विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयाेजन‎


.

गाव विस्थापित झाले, राहते घरदार सुटले; मात्र आराध्य दैवतावरील निष्ठा कणभरही ढळली नाही. मोर्णा धरणामुळे कोसगाव हे मूळ गाव पाण्याखाली जाऊन विस्थापित झाल्यानंतर गावचे भाविक स्व. उत्तम नारायण करवते यांनी गंगा देवीच्या मूर्तीला डोक्यावर वाहून कार्ला येथे आणले. १९७१ मध्ये कुडामातीच्या एका साध्या खोलीत सुरू झालेली देवीची ही सेवा आज एका भव्य व देखण्या मंदिराच्या रूपात उभी ठाकली आहे. ते हजारो भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे. एका भक्ताच्या निष्ठेतून सुरू झालेला हा भक्ति प्रवास करवते कुटुंब आजही तितक्याच श्रद्धेने पुढे नेत आहे.

कोसगावचे विस्थापन सुरू असताना स्व. उत्तम करवते यांनी देवीला सुरक्षित स्थळी नेण्याचा निर्धार केला. आख्यायिकेनुसार देवीला डोक्यावर घेऊन जात असताना आसोला गावाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठा आगीचा जाळ दिसला. दुसऱ्या मार्गावरही अडचणी आल्या. अखेर त्यांनी कार्ल्याच्या दिशेने वाट धरली. कार्ला गावाबाहेरील पाचपावली शिवारातील मोहाच्या झाडाजवळ पोहोचताच देवी थांबली. पुढे मार्गक्रमण करणे अशक्य झाल्याने त्या ठिकाणी सव्वा महिना विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत कार्ल्यातील गायवाडा परिसरात देवीची स्थापना केली. सुरुवातीला कुडामातीच्या खोलीत सुरू असलेल्या या देवस्थानाचा जीर्णोद्धार गावातील व परिसरातील भाविकांच्या दातृत्वात टप्प्याटप्प्याने झाला. विस्थापनाच्या काळात स्व. उत्तम करवते देवीची मूर्ती डोक्यावर घेऊन निघाले असता आसोला मार्गावर आगीचा जाळ दिसल्याने मार्ग बदलावा लागला होता. कार्ल्याबाहेरील पाचपावली शिवारात मोहाच्या झाडाजवळ देवीची मूर्ती स्थिरावली. पुढे जाता न आल्याने भाविकांनी तब्बल सव्वा महिना झाडाखालीच देवीची पूजा-अर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने गायवाडा परिसरात विधिवत स्थापना करण्यात आली. आज नवरात्रोत्सवात अकोला, पातूर तालुक्यासह संपूर्ण विदर्भ व मध्य प्रदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. नवरात्रात नऊ दिवस येथे भजन-कीर्तन होते. अखंड पोथीवाचन होते. नवव्या दिवशी महाप्रसादाचा भंडारा होतो. दसऱ्याला देवीची भव्य पालखी निघते. स्व. उत्तम करवते यांनी लावलेले हे भक्तीचे रोपटे आज त्यांचे चिरंजीव मोतीराम करवते व सूनबाई सीताबाई करवते तितक्याच निष्ठेने जपत आहेत.

मोहाच्या झाडाखाली सव्वा महिना पूजा

भक्तीचा वारसा पुढे नेणे हेच आमचे भाग्यच ^गंगादेवी ही आमची कुलदैवत व आराध्य दैवत आहे. माझे वडील स्व. उत्तम करवते यांनी १९७१ मध्ये कुडामातीच्या साध्या खोलीत देवीची स्थापना करून अखंड सेवा केली. भाविकांच्या दातृत्वात आज भव्य मंदिर साकारले आहे. वडिलांनी सुरू ठेवलेली ही सेवा आमच्या पुढील पिढ्यांनीही अशीच अविरत सुरू ठेवावी, हीच देवीच्या चरणी प्रार्थना आहे. मोतीराम उत्तम करवते, गंगादेवी भक्त, कार्ला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *