अमित शहा यांनी काल इंडिया आघाडीच्या मोर्च्याची पोलखोल केली आहे. कार्यकर्त्यांना धमक्या देत आणि बळजबरीने दिल्लीत बोलवले पण त्यांची संख्या ही 8 हजारांपेक्षा जास्त नव्हती हे अमित शहा यांनी सांगितले. परंतू राऊत त्यांच्यावर टीका करत आहे. त्या राऊतांना माह
.
नवनाथ बन म्हणाले की, राऊतांच्या डोळ्याची तपासणी करण्याची गरज आहे. दिल्लीमध्ये 8 हजाराच्या मोर्च्यासाठी अडीच लाख पोलिस बंदोबस्त होता असे ते सांगतात, इतके पोलिस तिथे काय करतील. आपली संख्या काय होती ते बघा. शिवतीर्थावर 250 लोकं जमवता आली नाही तर दिल्लीत 8 हजारांपेक्षा जास्त लोकं नव्हते. त्यामुळे झुंडशाही करण्याचा प्रयत्न करू नका. जनता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत आहे. 2029 मध्ये आमचा विजय होईल हे आम्ही केलेल्या कामाच्या विश्वासावर सांगत आहोत.

शायरीतून विरोधकांना टोला
नवनाथ बन म्हणाले की, इंडिया आघाडी दिल्लीमध्ये निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारच्याविरोधात आंदोलन करत आहे. यातून एक षडयंत्र रचन्याचा प्रयत्न करत आहे तर संजय राऊत सुद्धा त्यांचेच समर्थन करत आहेत. तमाम जुगनू जमकर एक साजिश करने लगे कि सूरज की रोशनी को अंधेरे मे बदला जाये. तुमच्यासारख्या कितीही लोकांनी सुर्याला झाकण्याचा प्रयत्न केला तर सुर्याला काही फरक पडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेने निवडून दिलेले सुर्यासारखे तेजस्वी आहेत तर विरोधक म्हणजे जुगनू सारखे सुर्यांचे तेज झाकोळण्याचा प्रयत्न करणारे आहेत.
राहुल गांधींकडून नौटंकी सुरू
नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांची संपूर्ण नौटंकी आपण काल पाहिली. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कॉलरला धरत मागे खेचले आणि आपल्याच कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे वर्तन देशातील लोकांनी पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कितीही षडयंत्र रचले तरी काही होणार नाही हे राऊतांनी लक्षात ठेवले पाहिजे.
13 कोटींचा आकडा सांगून संभ्रम निर्माण करू नका
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे नाव मतदारयादीत आहे का नाही हे त्यांनी सांगितले पाहिजे. ते सांगतात 13 कोटी लोकांची नावे मतदार यादीतून वगळली. 13 कोटीचा आकडा सांगताना लोकांची दिशाभूल करू नका. 6.30 कोटी लोकं हे कायमस्वरुपी स्थलांतरित झाले आहे. तर 3.1 कोटी लोकं अजून सापडले नाही. 2.8 कोटी मतदार हे मृत झाले आहेत. तर 1.2 कोटी यांची नावे दुबार होती. 26 लाख इतर वर्गवारी आहे. जे सापडले नाही त्यांना पुन्हा मतदान नोंदणी करण्याचा अधिकार आहे. 13 कोटीचा आकडा सांगून लोकांची दिशाभूल करू नका. जे पात्र असतील त्यांना पुन्हा नोंदणी करता येणार आहे.
हे ही वृत्त वाचा गृहमंत्री अमित शहांची नजर कमजोर अन् ते मानसिक दडपणाखाली:ज्ञानेशकुमार हे भाजपचे माफिया; आयोगात लेडी डॉन- संजय राऊत

जनता हुकुमशाही आणि ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत आहे. 2029 मध्ये पुन्हा भाजपचा विजय होईल हे अमित शहा यांच्या तोंडून ज्ञानेशकुमार बोलले असावे असे मला वाटते, ही ज्ञानेशकुमारची भाषा आहे. 12 कोटी नावे बेकायदेशीरपणे वगळली आहेत ती समाविष्ट करा आणि मग आमच्याशी बोला. अमित शहा यांची प्रकृती खराब आहे, ती बरी व्हावी या आमच्या शुभेच्छा आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर