Headlines

एकनाथ शिंदे नाराज नाहीत:विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, त्या 2 बैठकांच्या गैरहजेरीवर उदय सामंतांचा मोठा खुलासा




राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहिल्यामुळे ते महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात मोठे उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चा केवळ अफवा असून, उपमुख्यमंत्री कोणत्याही कारणास्तव नाराज नसल्याचा स्पष्ट खुलासा राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी केला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, म्हणजेच ‘नंदनवन’ येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आगामी निवडणुकांची रणनीती आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमागचे कारण स्पष्ट केले. “नाराजी-बिराजी काही नाही, साहेबांच्या वैयक्तिक अडचणी आहेत” उदय सामंत म्हणाले, अशी कोणतीही नाराजी-बिराजी नाही. साहेब काही वैयक्तिक कारणांमुळे आणि अडचणींमुळे या बैठकांना उपस्थित राहू शकले नाहीत. ते कारण मी आता उघड करू शकत नाही. परंतु, नाहक कोणीतरी चुकीची माहिती पसरवत आहे, आणि विरोधक अशाच पद्धतीने गोष्टी करत असतात. त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका.” तसेच, एकनाथ शिंदे उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला निश्चितपणे उपस्थित राहतील, अशी माहितीही सामंत यांनी दिली. विधान परिषद आणि आगामी निवडणुकांसाठी नंदनवनवर खलबते नंदनवन येथे पार पडलेल्या बैठकीबाबत बोलताना सामंत यांनी सांगितले की, ही बैठक प्रामुख्याने आगामी विधान परिषद आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी बोलावण्यात आली होती. १५ हजार कोटींच्या ‘ह्युंदाई’ प्रकल्पाचे पुण्यात उद्घाटन राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्रात आणलेल्या तब्बल १५ हजार कोटी रुपयांच्या ‘ह्युंदाई’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा उद्या पुण्यामध्ये पार पडणार आहे. याचबरोबर, मराठी भाषेला मिळालेल्या ‘अभिजात’ दर्जाच्या निमित्ताने राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या ‘अभिजात मराठी सप्ताहा’चा सांगता समारंभ उद्या संध्याकाळी जळगाव येथे पार पडणार असून, त्यासाठीही आपण उपस्थित राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. ——————— ही बातमी पण वाचा.. एकनाथ शिंदे नाराज झाले तर मोठा स्फोट होईल: सरकार बदलेल, उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवर बच्चू कडूंचे विधान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काही महत्त्वाच्या बैठकांना त्यांनी मारलेली दांडी आणि दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. याच चर्चेवर आता शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे साहेब नाराज नाहीत, पण ते जर नाराज झाले, तर थेट स्फोटच होईल आणि सरकार बदलून जाईल,” असं अत्यंत सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. अमरावतीमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही फटकेबाजी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *