![]()
श्रीरामपूर एमआयडीसीतील २२० केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्याच्या श्रेयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणुकीची चाहूल लागताच काही जणांना जाग आली असून, त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारून श्रेय घेण्याचा
.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून श्रीरामपूरच्या वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध कामांना गती मिळाल्याचे म्हटले आहे. श्रीरामपूर विभागाचे विभाजन करून बेलापूर येथे ग्रामीण उपविभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागाची स्वतंत्र विभागणी होऊन शहरावरील भार कमी होण्यास मदत झाल्याचा दावा त्यांनी केला.
एमआयडीसीतील उपकेंद्रासाठी निधीची तरतूद करून कामाला गती देण्यात आली असून, येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. उक्कलगाव येथे नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाले असून, त्याचेही काम सुरू होणार आहे. बेलापूर उपकेंद्रात सिंगल फेज वीज वितरणासाठी स्वतंत्र डीपी बसविण्यात येत आहे. उक्कलगावात ६० एकर क्षेत्रावर सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून, त्यातून लिलो प्रणालीद्वारे बेलापूर वीज केंद्राला वीज पुरविण्याचे नियोजन आहे. या कामांमुळे बेलापूर, ऐनतपूर, बेलापूर खुर्द, बेलापूर मळहद्द, उक्कलगाव, एकलहरे, केसापूर, चांदेगाव, उंबरगाव, भोसलेवाडी, वळदगाव, पढेगाव, कन्हेगाव, लाडगाव, मातापूर आणि निपाणीवडगाव या गावांतील वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा दावा नवले आणि खंडागळे यांनी केला. दरम्यान, सप्टेंबरअखेरीस आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे आणि सचिन गुजर यांनी उपकेंद्राच्या कामाची पाहणी केली होती.
जानेवारी महिन्यात लोकार्पणाचे नियोजन एमआयडीसीतील २२० केव्ही वीज उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा विखे समर्थकांनी केला आहे. दुसरीकडे, आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे आणि सचिन गुजर यांनी सप्टेंबरअखेरीस पाहणी करून काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. जानेवारीत लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे उपकेंद्राचे काम प्रत्यक्ष कधी पूर्ण होते आणि त्याचा वीजपुरवठ्यावर काय परिणाम होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.