![]()
केमिस्ट ॲड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक जाहीर, संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमुळे होणारी बदनामी रोखण्यासह विविध प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत मंगळवारी काही सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
.
केमिस्ट ॲड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कारभाराच्या चौकशीची मागणी उपोषणकर्त्यांनी केली. उपोषण अंजुल जैन, दिलीप चवरे आरिफ खान, राजेश राठी, जुनेद खान, वैभव गुल्हाने यांनी केले. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या आयडी पासवर्डचा गैरवापर केला असून आरोपामुळे संघटनेची बदनामी होत आहे. याप्रकरणी चौकशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
रोषातून बिनबुडाचे आरोप ^काही जण वैयक्तिक रोषातून बिनबुडाचे आरोप करीत आहेत. अकोला केमिस्ट ॲड ड्रगिस्ट असोसिएशनही राज्यस्तरावरील संघटनेची संलग्न आहे. सर्व कामकाज नियमानुसारच होत आहे. कोणतेही काम बेकायदेशीर, निमयबाह्यपणे झालेले नाही. संबंधित सदस्यांना संघटनेच्या काही जणांचा पाठिंबादेखील नाही. -मंगेश घुगुल, अध्यक्ष ,अकोला केमिस्ट अॅड ड्रगिस्ट असोसिएशन.