![]()
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सध्या प्रचंड आक्रमक झाली आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी नागपुरात बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, आपली पार्टी ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या CJP च्या नेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून, विशेष न्यायालयाने आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. “ज्ञानेश कुमार निवडणुकांमध्ये फेरफार करत आहेत” नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत दिपके यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “आमचा सर्वांचा लढा एकाच उद्देशासाठी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निवडणुकांमध्ये फेरफार करत आहेत आणि नरेंद्र मोदी यांना सत्तेत टिकून राहण्यासाठी मदत करत आहेत. त्यांच्या या कारभाराविरुद्ध आम्ही लढत आहोत.” ‘इंडिया’ आघाडीबाबत CJP ची भूमिका स्पष्ट CJP ही स्वतंत्र संघटना असल्याचे सांगत दिपके यांनी ‘इंडिया’ आघाडीसोबतच्या त्यांच्या समीकरणावरही भाष्य केले. “कॉकरोच जनता पार्टी हा एक स्वतंत्र दबाव गट आहे आणि भविष्यातही तो एक स्वतंत्र दबाव गटच राहील. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही ‘इंडिया’ ब्लॉकच्या विरोधात आहोत. इंडिया आघाडी आणि आमचे आंदोलन हे एकाच समान ध्येयासाठी आणि उद्दिष्टासाठी सुरू आहे,” असे दिपके यांनी स्पष्ट केले. दिल्लीत रांका आणि दास यांना ५ दिवसांची कोठडी दुसरीकडे दिल्लीत CJP च्या आंदोलकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मंगळवारी सकाळी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी CJP चे आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पहाटे ३ वाजता या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली. अजिंक्य शिंदेंची सुटका बुधवारी सकाळी या तिघांनाही दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आशुतोष रांका आणि सौरव दास या दोघांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, त्यांच्यासोबत अटक करण्यात आलेले अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. —————– हेही वाचा.. सौरव, आशुतोषला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी: रात्री 3 वाजता अटक; CJP नेत्यांना जंतरमंतरवर गेल्याप्रकरणी झाली होती अटक
दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासोबत अटक करण्यात आलेल्या अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर (पर्सनल बाँड) सुटका करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
Source link
CEC ज्ञानेश कुमार मोदींना मदत करत आहेत:दिपकेंचा आरोप, म्हणाले- CJP हा स्वतंत्र दबाव गट, पण आमची आणि इंडिया आघाडीची लढाई एकच