Headlines

राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय:पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन ठरावासह शेगाव संस्थानला बांधकामास मंजुरी, वाचा सविस्तर




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. घटनात्मक पदांवर सलग 25 वर्षे यशस्वी जनसेवा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंत्रिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला. यासोबतच शासकीय मालकीच्या अयोग्य आकाराच्या भूखंडांच्या वितरण धोरणात सुधारणा करण्याचा आणि बुलढाण्यातील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या गिरडा येथील यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकामाला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ निर्णय: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर घटनात्मक पदावर राहून सलग पंचवीस वर्षे यशस्वीरीत्या जनसेवा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ठराव मांडला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावाचे स्वागत केले. शासकीय अयोग्य भूखंडांच्या वितरण धोरणात सुधारणा शासकीय मालकीच्या आकाराने लहान, स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य, चिंचोळ्या, अनियमित आकाराच्या तसेच पोहोच मार्ग नसलेल्या भूखंडांच्या वाटपाबाबतच्या धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी ‘महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१’ च्या नियम ३७ आणि ३७ (अ) मधील तरतुदींमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग) संत गजानन महाराज संस्थानला गिरडा यात्रास्थळ विकासासाठी बांधकामास परवानगी बुलढाणा तालुक्यातील मौजे गिरडा येथील यात्रास्थळाच्या विकासासाठी श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांना कायमस्वरूपी बांधकाम करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. संस्थानाला यापूर्वीच वृक्षलागवडीसाठी दिलेल्या १९ हेक्टर ६ आर क्षेत्रापैकी ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर हे बांधकाम करता येईल. यामुळे गिरडा येथे येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम पायाभूत व नागरी सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग) या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. राज्य सरकारचा बळीराजाला दिलासा:दुष्काळग्रस्तांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; चारा हमीभावाने खरेदीसह मुख्यमंत्री फडणवीसांचे 4 मोठे निर्णय राज्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने बळीराजाला मोठा दिलासा देणारे चार महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. पूर्वी जाहीर केलेल्या 265 तालुक्यांमध्ये आणखी 40 तालुक्यांची भर घालत आता राज्यातील तब्बल 305 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *